'गोवा होलसेल विक्रीस काढलाय का'? मेगा प्रोजेक्ट, डोंगर कापणी, भू-रुपांतरावरुन वाढता जनआक्राेश

Goa News: सांकवाळ येथील ‘भूतानी’ आणि रेईश मागूश येथे डीएलएफ कंपनीच्या प्रस्तावित मेगा प्रोजेक्टमुळे गोवा भाजप वेगवेगळ्‍या माध्‍यमांतून टीका केली जात आहे
Goa News: सांकवाळ येथील ‘भूतानी’ आणि रेईश मागूश येथे डीएलएफ कंपनीच्या प्रस्तावित मेगा प्रोजेक्टमुळे गोवा भाजप वेगवेगळ्‍या माध्‍यमांतून टीका  केली जात आहे
Goa Mega Projects Criticizm Canva|DG
Published on
Updated on

मडगाव: सांकवाळ येथील ‘भूतानी’ आणि रेईश मागूश येथे डीएलएफ कंपनीच्या प्रस्तावित मेगा प्रोजेक्टमुळे संपूर्ण गोवा भाजप सरकारने होलसेल विक्रीवर काढला आहे, अशी टीका आता वेगवेगळ्‍या माध्‍यमांतून केली जात आहे.

भूतानी प्रकल्‍पाच्‍या (Bhutani Infra Project) विरोधात यापूर्वीच उच्‍च न्‍यायालयात स्‍थानिकांनी याचिका दाखल केली आहे. आता रेईश-मागूश येथील डीएलएफ कंपनीच्‍या प्रकल्‍पाविराेधातही (DLF Villa Reis Magos Goa) लवकरच उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली जाणार असल्‍याचे सांगितले जाते. या दोन्‍ही प्रकल्‍पांत मोठ्या प्रमाणात डोंगर कापणी (Hill Cutting) केली असून असा राजरोस विध्‍वंस सुर असताना सरकारने मात्र त्‍याकडे मुद्दाम डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे.

सध्‍या भूतानी प्रकल्‍पाच्‍या विरोधात जनआक्राेश वाढला असून त्‍यामुळे सरकारला काही प्रमाणात नमते घ्‍यावे लागले आहे. या प्रकरणात जर कुठलाही बेकायदेशीर प्रक़ार झाला असेल तर त्‍याची चौकशी करू, अशी भूमिका मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी घेतली आहे. असे जरी असले तरी सरकारच्‍या या भूमिकेवर आंदोलक विश्वास ठेवण्‍याच्‍या भूमिकेत नाहीत. जोपर्यंत या प्रकल्‍पाला दिलेला बांधकाम परवाना मागे घेतला जात नाहीत, ताेपर्यंत आमचे आंदाेलन सुरूच राहील, असा इशारा पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते नारायण नाईक़ यांनी दिला आहे.

दुसऱ्या बाजूने रेईश-मागूश येथे उभा डोंगर कापून डीएलएफ कंपनीने ज्याप्रकारे पर्यावरणाचे लचके तोडले, ते पाहिल्‍यास भविष्‍यात येथे वायनाडसारखी दुर्घटना होऊ शकते, अशी भीती स्‍थानिक कार्यकर्ते राजेश दाभाेलकर, एडविन फर्नांडिस यांनी व्यक्त केली असून लवकरच आम्‍ही हे बांधकाम बंद करावे यासाठी उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल करणार आहोत, असे सांगितले.

सांकवाळ (Sancoale) आणि रेईश मागूश (Reis Magos) हे दोन्‍ही प्रकल्‍प म्‍हणजे, सरकारच्‍या मान्‍यतेने गोव्‍याच्‍या पर्यावरणावर दिवसा ढवळ्या घातलेला दराेडा आहे, अशी प्रतिक्रिया नारायण नाईक़ यांनी व्‍यक्‍त करताना, सध्‍या सरकारने चाैकशी सुरू केल्‍यामुळे आम्‍ही सबुरीची भूमिका घेतली आहे.

मात्र, ही चौकशी केवळ फार्स असल्‍याचे सिद्ध झाल्‍यास आंदाेलन अधिक उग्र करू. हा फक्‍त सांकवाळ आणि रेईश-मागूशपुरता प्रश्न राहिलेला नसून हा संपूर्ण गोव्‍याचा प्रश्न बनला आहे. या विध्‍वंसकारी प्रक़ल्‍पाला विरोध करण्‍यासाठी मेगा निषेध रॅली आयाेजित करण्‍यासाठी आम्‍हाला प्रस्‍ताव येत आहेत; पण सरकार काय करते हे पाहण्‍यासाठी आम्ही सध्‍या शांत आहाेत, असे नाईक यांनी सांगितले.

मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत आणि नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी या प्रकल्‍पाबाबत भूमिका स्‍पष्‍ट केली असताना गुदिन्‍हो अजूनही या प्रकल्‍पाच्‍या विरोधात एकही शब्द का काढलेला नाही, असा प्रश्न नाईक यांनी केला.

रेईश मागूश प्रकल्‍पही सरकारच्‍या मान्‍यतेनेच लोकांवर लादला जात असून हा प्रकल्‍प मार्गी लावण्‍यासाठी ज्‍या निर्दयतेेने डोंगरकापणी केली आहे ते पाहिल्‍यास या प्रकल्‍पाच्‍या जवळ असलेल्‍या ३०० घरांना त्‍याचा धाेका आहे.

राजेश दाभोलकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com