CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Rules: भाडोत्री वाहनास अपघात झाल्यास चालक, मालकालाही धरणार जबाबदार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

दैनिक गोमन्तक

Goa Traffic Rules: राज्यात वाढत्या वाहन अपघातांमुळे, वाहतूक नियम पाळणे सर्वांना अनिवार्य आहे. तसेच भाडेपट्टीवर वाहने घेऊन ती बेफाम चालवून जर अपघात झाल्यास, वाहनचालकाबरोबरच वाहनमालकालाही जबाबदार धरण्यात येईल. त्यामुळे भाड्याने वाहन देणाऱ्या मालकांनी ग्राहकांना सुरक्षित व सावधपणे

वाहन हाकण्यास सांगावे, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. पणजी येथील कदंब परिवहन महामंडळाच्या ४३ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलते होते. यावेळी त्यांच्यासमवेत वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कदंब परिवहन महामंडळाच्या गोव्यातील सेवेचे कौतुक केले. कदंब महामंडळ आम्ही कसे नफ्यात आणू शकतो यावरही विचार केला पाहिजे.

कार्यालयात बसून काम करणारे कर्मचारी कदंबला नफ्यात आणू शकत नाहीत, तर कदंब बसचालक आणि वाहक उत्तम सेवेद्वारे प्रवासी खेचून आणून कदंबला नफ्यात आणू शकतात, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

‘लास्ट माईल्स कनेक्टिव्हिटी’बद्दल मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की ‘माझी बस’ योजना ही गावोगावच्या शेवटच्या टप्प्यात बस पोचवून लोकांना चांगली वाहतूक सेवा देण्यासाठी सुरू केली आहे.

वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, की राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा संपल्यावर पणजीत आणि आजूबाजूच्या परिसरात इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्यात येईल.

डिजिटल बस तिकिटाची लवकरच सोय

राज्यातील नागरिकांना गोवा माईल्स किंवा इतर टॅक्सीचा पर्याय निवडण्याची मुभा आहे. जर गोवा माईल्समधून फिरण्यास लोकांना परवडत असेल, तर त्यांना तो पर्याय निवडण्याचा हक्क आहे. येत्या काही दिवसात लोकांना बसचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी डिजिटल पर्यायाने तिकिटे देणे सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT