गोवा

Video: 'मुख्यमंत्री असावा तर असा!' रस्त्यावर जखमी महिलेला पाहून CM सावंतांनी ताफा थांबवला; 'स्वतःच्या गाडीतून' रुग्णालयात नेलं

CM Sawant viral video: मुख्यमंत्री सावंत यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि त्यांच्या या कृतीचं कौतुक केलं जातंय

Akshata Chhatre

CM Pramod Sawant Stops Convoy: बुधवारी (दि.३) च्या दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या संवेदनशीलतेमुळे एक दुर्मीळ घटना पाहायला मिळाली. नियमित दौऱ्यावर असताना रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या एका महिलेला पाहून त्यांनी कोणताही विचार न करता तात्काळ आपला ताफा थांबवला आणि जखमी महिलेला त्वरित रुग्णालयात उपचारांसाठी पाठवलं. मुख्यमंत्री सावंत यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि त्यांच्या या कृतीचं कौतुक केलं जातंय.

या व्हिडीओमध्ये प्रवासाचा प्रोटोकॉल बाजूला ठेवून मुख्यमंत्री सावंत यांनी ॲम्ब्युलन्सची वाट न पाहता जखमी महिलेला त्वरित मदत पोहोचवताना दिसतायत. ते स्वतः गाडीतून खाली उतरले, जखमी महिलेला धीर दिला आणि तिच्याशी अत्यंत विनम्रपणे संवाद साधला.

या व्हिडीओमध्ये प्रवासाचा प्रोटोकॉल बाजूला ठेवून मुख्यमंत्री सावंत यांनी ॲम्ब्युलन्सची वाट न पाहता जखमी महिलेला त्वरित मदत पोहोचवताना दिसतायत. ते स्वतः गाडीतून खाली उतरले, जखमी महिलेला धीर दिला आणि तिच्याशी अत्यंत विनम्रपणे संवाद साधला.

एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या टीमला महिलेला मदत करण्याचे निर्देश दिले. त्यांनी स्वतःच्या ताफ्यातील एका वाहनातत्या जखमी महिलेला सुरक्षितपणे बसवून, वेळ न गमावता तातडीने रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले.

यानंतर त्यांनी हा अपघात कसा झाला याची चौकशी केली आणि यावर त्वरित कारवाई सुद्धा करण्याचे निर्दश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. घडल्या प्रसंगात हा अपघात हिट अँड रनची केस आहे.

मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि माणुसकीच्या कृतीमुळे रस्त्यावरील उपस्थित लोक स्तब्ध झाले. नेहमीची मोटरकेडची हालचाल बाजूला सारून त्यांनी केलेले हे मानवतावादी कार्य अनेकांना प्रेरणा देऊन गेले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी संवेदनशील नेतृत्वाचा एक उत्कृष्ट नमुना घालून दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात नाताळचा उत्साह! मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडून शांतता व एकात्मतेचा संदेश; आर्चबिशपांनी केली शांततेची प्रार्थना

कलंगुट पोलिसांची मोठी कारवाई! साडेचार लाखांच्या ड्रग्जसह हळदोणचा तरुण गजाआड; ख्रिसमसच्या तोंडावर तस्करांचे धाबे दणाणले

Goa Politics: 'त्याचा' फटका विधानसभेत बसणार नाही! मतांच्या टक्केवारीतून जनतेने भाजपलाच कौल दिला; दामू नाईक

आयपीएल 2026 पूर्वी आरसीबीचं वाढलं टेन्शन, लैंगिक अत्याचारप्रकरणी स्टार गोलंदाजाला कोर्टाचा दणका; कोणत्याही क्षणी अटक?

Goa Politics: "ते म्हणणं शाब्दिक अर्थाने घेऊ नका", सत्यविजय नाईकांचे 'बॅकस्टॅबिंग'; दामू नाईकांचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT