Viral Video: मालगाडीखाली बसून रोमान्स! बेधुंद कपल मरता मरता वाचले, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी संतापले

Couple Viral Video: सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण जोडपे रेल्वे ट्रॅकवर बसलेले दिसत आहे.
Couple Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Couple Viral Video: सोशल मीडियावर स्क्रोलिंग करताना अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहून लोक अक्षरशः डोक्याला हात लावतात आणि 'आजकाल लोकांना झाले तरी काय?' असा प्रश्न विचारतात. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या प्रत्येकाला हे माहीत आहे की, कधीकधी लोकांचे अविचारी आणि मूर्खपणाचे कृत्य त्यांच्या जीवाला धोका निर्माण करु शकते. असाच एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका जोडप्याचा मूर्खपणा स्पष्टपणे दिसून आला आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

Couple Viral Video
Viral Video: 'अखेरची' सफारी ठरली असती, पिसाळलेल्या हत्तीने गाडीचा केला पाठलाग, पर्यटकांची झाली पळापळ, पाहा व्हिडिओ

कपलने नेमका काय मूर्खपणा केला?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण जोडपे रेल्वे ट्रॅकवर बसलेले दिसत आहे. मात्र, ते रिकाम्या ट्रॅकवर बसलेले नाही. ज्या ट्रॅकवर हे जोडपे बसले, तिथे आधीपासूनच मालगाडी उभी होती आणि हे दोघेही त्याच मालगाडीच्या खाली बसले होते. व्हिडिओमध्ये ते दोघे वारंवार एकमेकांना मिठी मारताना आणि रोमान्स करताना दिसत आहेत. याचदरम्यान अचानक ही मालगाडी सुरु होते आणि पुढे सरकू लागते. मालगाडी सुरु झाल्याचे लक्षात येताच हे दोघेही मोठ्या प्रयत्नांनी बाजूला होऊन स्वतःचा जीव वाचवतात.

रील्ससाठी जीवाशी खेळ!

या व्हिडिओमध्ये अनेक 'कट' असल्यामुळे हा व्हिडिओ केवळ सोशल मीडियावर 'रील' बनवण्यासाठी चित्रित करण्यात आला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु, रील बनवण्यासाठी केलेला हा स्टंट अत्यंत मूर्खपणाचा आणि धोकादायक आहे. जर हा व्हिडिओ स्क्रिप्टेड नसेल तर त्यांची ही अविचारी 'आशिकी' त्यांचे वरचे तिकीट (मृत्यू) कापण्यास कारणीभूत ठरली असती. अशा प्रकारच्या मूर्खपणाच्या कृत्यांपासून प्रत्येक व्यक्तीने नेहमी दूर राहायला हवे, कारण जीव वाचण्याची शक्यता खूप कमी असते.

Couple Viral Video
Sangolda Casino: कॅसिनो कर्मचाऱ्यांचा दारूच्या नशेत धिंगाणा! सोशल मीडियावर होताहेत आरोप; सांगोल्डा येथील Viral Video मुळे चर्चा

सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ 'एक्स' वर @nehraji77 नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. ही बातमी लिहेपर्यंत, या व्हिडिओला 4 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आणि त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

  • हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने कमेंट केली की, "हे लोक मरता मरता वाचले."

  • दुसऱ्या एका युजरने संताप व्यक्त करत लिहिले, "कसे कसे हुशार लोक आहेत, मरुनच गेले असते."

  • तिसऱ्या युजरने उपरोधिकपणे लिहिले, "प्रेमामध्ये आता हे दोघे अमर झाले असते."

  • दरम्यान, काही लोकांनी हा व्हिडिओ एआय तंत्रज्ञानाने बनवलेला किंवा बनावट असल्याचेही मत व्यक्त केले.

Couple Viral Video
Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

तरीही, सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या धोकादायक आणि अविचारी कृत्यांनी पुन्हा एकदा लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला आहे. केवळ लाइक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी तरुणाई आपल्या जीवाशी कसा खेळ करत आहे, हे या घटनेतून स्पष्ट होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com