LOP Yuri Alemao And CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Video: 'ढवळीकर झोपले त्यांना जागे करा'; मुख्यमंत्री कुसुमाग्रजांची कविता सादर करताना युरींची मिश्किल टिपण्णी अन् सभागृहात हशा पिकला

Goa Assembly Monsoon Session 2025: मुख्यमंत्री सावंत यांनी राज्याचा अर्थसंकल्प चिप्सच्या पॅकेटसारखा नव्हे तर गणेश चतुर्थीच्या माटोळीसारखा आहे, या शब्दात विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले.

Pramod Yadav

पर्वरी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेचा शेवट करताना वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांची कविता सादर केली. मुख्यमंत्री सावंत कविता सादर करत असताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मध्येच उठून मंत्री सुदीन ढवळीकर झोपले आहेत, त्यांना जागे करा आणि नंतर कविता वाचा, असा मिश्किल टोला लगावला आणि सभागृहात एकच हशा पिकला.

पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री प्रमोद सावंत यांनी अर्धसंकल्पावर सर्वांनी मते मांडल्यानंतर भाषण केले. मुख्यमंत्री सावंत यांनी राज्याचा अर्थसंकल्प चिप्सच्या पॅकेटसारखा नव्हे तर गणेश चतुर्थीच्या माटोळीसारखा आहे, या शब्दात विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले. बेघरांना घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर योजना पुढील अर्थसंकल्पात सादर केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री सावंत यांनी भाषणात दिले.

१९७२ पूर्वी खासगी जागेत बांधण्यात आलेली अनधिकृत घरे याच अधिवेशनात नियमित करणार असल्याचे सावंत म्हणाले. येत्या ०२ ऑक्टोबरपासून राज्याला १०० टक्के प्लॅस्टिकमुक्त करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. खनिज डंपचा दोन महिन्यात लिलाव केला जाईल असेही सावंत म्हणाले. १२ पैकी ०९ लीज सुरु असून, उर्वरीत चार लीजचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री सावंत यांनी भाषणाची सांगता करताना कुसुमाग्रज यांची कविता सादर केली. सावंत कविता सादर करत असताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांना मध्येच थांबवत मंत्री सुदीन ढवळीकर झोपले असून, त्यांना जागे करा अशी मिश्किल टिपण्णी केली. आलेमाव बोलताच सभागृहात एकच हशा पिकला. मुख्यमंत्री सावंत यांनी सुदीन झोपेत असले तरी त्यांना कविता समजेल, तुम्ही व्यवस्थित ऐका नाहीतर कोकणीत भाषांतर करुन देतो, असे म्हणाले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या निर्धार या कवितेतील एक कडवे सभागृहात वाचून दाखवले.

या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची,

दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची,

पहाड़ डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची,

जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदा शिरी,

रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी?

हे कडवे मुख्यमंत्री सावंत यांनी सभागृहात सादर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

धक्कादायक! शेवपुरी खाणं बेतलं जीवावर, दोडामार्गच्या 35 वर्षीय तरुणाचा गोव्यात मृत्यू

Child Health Tips: पालकांनो, दुर्लक्ष नका करु! मुलांच्या आरोग्यासाठी वर्षातून एकदा हिमोग्लोबिन तपासणी का करावी? योग्य पातळी किती असावी? जाणून घ्या

Ravichandran Ashwin BBL: रविचंद्रन अश्विन 'बिग बॅश लीग'मध्ये खेळणार, 'या' संघाकडून मैदानात उतरणार; 'अशी' कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय

Salman Khan: बॉलिवूडचा सल्लूभाई म्हणतो, 'एक दिवस मलाही मुलं होतील'

Viral Video: लव्ह, फन आणि ताकद! नवऱ्यांना उचलून बायकांनी लावली आगळीवेगळी शर्यत, व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

SCROLL FOR NEXT