Teen Steals ₹95 Lakh:बाबांचा मृत्यू, आई दिल्लीत असताना लहान मुलाने घरातून चोरी केले 95 लाख, मित्रासोबत निघाला होता गोव्याला; विमानतळावर घेतले ताब्यात

Goa crime connection Gujarat: अल्पवयीन मुलाने घरातील तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने बनावट चावी तयार करणाऱ्याला देखील बोलावले होते.
Minor caught at airport| 95 lakh robbery case
Boy steals 95 lakh | Gujrat Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Gujarat to Goa crime: कच्छ जिल्ह्यातील भूज येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलाने घरातून तब्बल ९५ लाख रुपयांची रोकड आणि दागिने चोरी केले. त्यानंतर तो मित्रासह गोव्याला निघाला. अल्पवयीन मुलाच्या आईला हे कळताच तिने पोलिसांना याबाबत माहिती दिली. दोघेही गोव्याला जाणारे विमान पकडण्यासाठी अहमदाबाद विमानतळावर पोहोचले, परंतु त्यापूर्वीच पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना विमानतळावरून ताब्यात घेतले.

एका प्रसिद्ध हिंदी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, भूज येथील एका कंत्राटदाराचे ६ महिन्यांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून त्याची पत्नी व्यवसाय सांभाळत होती. महिला व्यवसायाच्या कामानिमित्त दिल्लीला गेली होती.

यादरम्यान तिच्या अल्पवयीन मुलाने घरातील तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने बनावट चावी तयार करणाऱ्याला देखील बोलावले. मुलाला तिजोरीत २५ लाख रुपये रोख आणि काही सोन्याचे दागिने सापडले.

Minor caught at airport| 95 lakh robbery case
Goa Cricket Stadium:गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम होणार का नाही? 7 वर्षापासून GCA ची चालढकल; जमीन काढून घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा

तिजोरीतील पैसे आणि दागिने घेऊन अल्पवयीन मुलगा त्याच्या मित्रासोबत गोव्याला जाण्यासाठी सज्ज झाला. त्याने एजंटमार्फत अहमदाबादहून गोव्याला जाण्यासाठी विमान बुक केले होते. तिकीट मिळाल्यानंतर तो अहमदाबादला आला. त्याची आई घरी परतल्यावर तिला ही गोष्ट समजताच तिने तात्काळ भूज पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार दाखल केली.

भूज पोलिसांनी दाखल तक्रारीच्या आधारे तपास सुरू केला. अल्पवयीन मुलगा अहमदाबाद विमानतळावर पोहोचला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, मित्रासोबत तो गोव्याला जात असल्याची माहिती देखील त्यांना मिळाली. त्यानंतर अहमदाबाद गुन्हे शाखेला माहिती देण्यात आली. अहमदाबाद गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने अल्पवयीन मुलाला आणि त्याच्या मित्राला विमानतळावरून ताब्यात घेतले. दोघेही कोलकात्याला जाणाऱ्या विमानात चढणार होते, त्याआधी अहमदाबाद पोलिस तिथे पोहोचले.

Minor caught at airport| 95 lakh robbery case
Marcel: बालचमूंचा आनंदोत्सव! गोव्याची समृद्ध लोकनृत्याची परंपरा; माशेलमध्ये रंगल्या स्पर्धा

गुन्हे शाखेने दोघांनाही भूज पोलिसांच्या स्वाधीन केले. चोरीमागील कारण ब्लॅकमेलिंग असल्याचे अल्पवयीन मुलाने पोलिसांना सांगितले आहे, पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे. पोलिस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

अल्पवयीन मुलगा गोव्याला जात होता, त्यानंतर तो घाबरला तेव्हा त्याने गोव्याचे तिकीट रद्द केले आणि कोलकात्याचे तिकीट बुक केले, ज्यामध्ये तो चढत होता, त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com