CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

'रिल्स पाहून ज्ञान मिळणार नाही, मोबाईलचा वापर ध्येय गाठण्यासाठी करा!', CM प्रमोद सावंतांचे विद्यार्थ्यांना आवाहन

Pramod Sawant Students Message: आपल्या हातातील मोबाईलवर केवळ रिल्स पाहून कोणत्याही प्रकारचे ज्ञान मिळणार नाही.

दैनिक गोमन्तक डिजिटल

साखळी: आपल्या हातातील मोबाईलवर केवळ रिल्स पाहून कोणत्याही प्रकारचे ज्ञान मिळणार नाही. त्याऐवजी मोबाईलवरील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान शिकून त्याचा वापर आपले ध्येय गाठण्यासाठी करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

साखळी येथील रवींद्र भवनात सम्राट इंटरनॅशनलतर्फे सम्राट स्टुडंट फाउंडेशनच्या रौप्य महोत्सवानिमित्त गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या २५ जणांचा गौरव करण्यात आला.

यावेळी प्रसिद्ध सिनेकलाकार अजय पुरकर, सम्राट स्टुडंट फाउंडेशनचे अध्यक्ष धर्मा चोडणकर, सम्राट क्लब इंटरनॅशनलचे अध्यक्ष संदीप निगळ्ये, सम्राट क्लब राज्य १ चे अध्यक्ष शशिकांत पुनाजी, आयोजन समितीचे अध्यक्ष रूपेश ठाणेकर, माजी राज्याध्यक्ष तथा संचालक दीपक नार्वेकर आदी उपस्थित होते.

गोव्यात नवीन शैक्षणिक युगाला सरकारने प्रारंभ केला असून, त्यानुसार शिक्षणपद्धती राबविण्यात येत आहे. राज्यात केवळ आर्थिक कारणांमुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, याची खबरदारी सरकारने घेतली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले. यावेळी अजय पुरकर यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना मार्गदर्शन केले.

२५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते रियाना अब्बास अली नदाफ, श्रुती सतीशकुमार सावंत, डेलस्टन डिसोझा, वृषभ रामदास सतरकर, रुद्रेश रोहिदास शेटकर, श्रेया श्रीधर नाईक, मंजुषा रोहिदास मडकईकर, भूपेश पंढरी नाईक, डॉ. श्रुती मंगेश नाईक, मंगेश सागर साकोर्डेकर, डॉ. निमिषा महेश पारकर, डॉ. तन्वी सुबीर संजीगिरी, डॉ. तृप्ती सुदाम आरोंदेकर, वैभवी भालचंद्र गावस, वेदांग विश्वास सतरकर, डॉ. श्रीराज प्रमोद सावंत, नेहा डा रोचा, डॉ. श्रीगणेश योगानंद नागवेकर, प्रथमेश प्रेमानंद शानबाग, डॉ. ओजस्वी सिताराम गावडे, रीमा राजेंद्र परब, नमिता तुकाराम अडवईकर, विशाखा गोविंद माटकर, मेखला अनंत साळकर आणि श्रावणी अभिषेकी यांचा गौरव करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mayna Construction Project: बांधकाम प्रकल्पाविरोधात मोर्चा, मायणावासीय आक्रमक; कुडतरी पंचायतीवर धडक

iPhone 17 Pro वर भन्नाट डील! 1.34 लाखांचा फोन फक्त 56,990 रुपयांत, जाणून घ्या ऑफर

"पीओके तात्काळ खाली करा!" UN च्या मंचावरुन भारताचा पाकिस्तानला सज्जड दम; मानवाधिकार परिषदेत दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांचे धुडकावले दावे

Ananta Chaturdashi: अनंताच्या धाग्यात गुंफलेली गोव्याची परंपरा

सॉफ्टवेअरच सर्वेसर्वा?- संपादकीय

SCROLL FOR NEXT