Pramod Sawant, IHCL Taj, Skill development  Dainik Gomantak
गोवा

Goa Skill Development: गोवा सरकारचा ‘स्किल डेव्हलपमेंट’साठी ‘ताज’ ग्रुपशी करार! राज्यात वर्षभरात होणार सेंटर

Skill Development Center: पुरुष आणि महिलांसाठी असलेल्या या अभ्यासक्रमांत फूड प्रोडक्शन, फूड सर्विसेस, फ्रंट ऑफिस आणि हाऊसकीपिंग या चार विभागांचा समावेश असेल.

Sameer Panditrao

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोवा सरकारने आयएचसीएल ताज ग्रुप आणि संचालनालय ऑफ स्किल डेव्हलपमेंट यांच्या सहकार्याने राज्यात नवीन स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यासाठी करार केला आहे.

हा उपक्रम गोव्यातील तरुणांसाठी स्किलिंग, रिस्कीलिंग आणि अपस्किलिंग यासंदर्भात मोठी संधी निर्माण करणार आहे. हे सेंटर एका वर्षात पूर्ण होणार असून, प्रारंभी १००० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

पुरुष आणि महिलांसाठी असलेल्या या अभ्यासक्रमांत फूड प्रोडक्शन, फूड सर्विसेस, फ्रंट ऑफिस आणि हाऊसकीपिंग या चार विभागांचा समावेश असेल. देशभरात ताज ग्रुपची ४७ कौशल्य विकास केंद्रे आहेत, आणि आता गोवा देखील त्यात सामील होणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, गोव्यासाठी हा कौशल्य विकासाच्या दृष्टिकोनातून मोठा दिवस आहे. गेल्या वर्षभरात ११ आयटीआय केंद्रांमध्ये हॉस्पिटॅलिटी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. ताज ग्रुपसोबत भागीदारी करत आग्वाद फोर्ट येथे स्किल डेव्हलपमेंट सेंटर स्थापन होणार आहे.

१ लाख लोकांना प्रशिक्षण!

दरवर्षी १००० विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याची खात्री असून, २०३० पर्यंत बहुसंख्य लोकांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य सरकारने ठरवले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आयएचसीएलचे एमडी तथा सीईओ पुनीत कुमार चतवाल यांचे आभार मानले आणि गोव्यातील पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठी ही भागीदारी महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 2nd ODI: रोहित शर्मासाठी वेलिंग्टन 'डेंजर झोन', खराब रेकॉर्ड चिंतेचा विषय; दुसऱ्या वनडेत इतिहास बदलण्याचे आव्हान

Andre Russell World Record: टी20 क्रिकेटचा 'बादशाह'! 10,000 धावा आणि 500 विकेट्स घेणारा आंद्रे रसेल ठरला जगातील पहिला खेळाडू; मोडले जुने वर्ल्ड रेकॉर्ड

Shukra Gochar: शुक्राची कृपादृष्टी अन् पैशांचा पाऊस! 6 ते 22 नोव्हेंबरचा काळ 'या' राशींसाठी ठरणार वरदान; होणार छप्परफाड धनलाभ

Diwali Inflation Report 2026: दूध, तूप, ड्रायफ्रूट्सपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत... ऐन दिवाळीत महागाईचा झटका; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

Illegal Hill Cutting: बांधकामाचा परवाना आहे, पण डोंगरकापणीची परवानगी कुठे? व्हिडीओ व्हायरल होताच तलाठ्यांची पाहणी; कारवाई मात्र अद्याप नाही!

SCROLL FOR NEXT