Goa Mission Rabies 
गोवा

Goa Mission Rabies: राज्यात कुत्राच्या हिंसक जातींवर बंदी घालणार : मुख्यमंत्री सावंत

खात्याकडून तसे प्रयत्न सुरू झाले आहेत : मुख्यमंत्री

दैनिक गोमन्तक

World Rabies Day: मानवी जीवनाला उपद्रवी ठरणाऱ्या कुत्र्याच्या हिसंक जातींवर बंदी घालण्याचा सरकारचा विचार करीत असून खात्याकडून तसे प्रयत्न सुरू झाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय रेबीज दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. तेव्हा आपण कुत्रा पाळणार असाल किंवा तो घेण्याचा विचार करत असाल तर थांबा. आपला कुत्रा बंदी असलेल्या जातीचा नाही ना, याची खात्री करणे गरजेचे आहे. कुत्री पाळण्याचा छंद जुना आहे.

मात्र, कुत्र्यांच्या काही जाती मूलतः नैसर्गिक प्राणी असल्याने त्या आक्रमक व उपद्रवी ठरतात. याचा प्रत्यय ताळगाव येथे आला. काही दिवसांपूर्वी रस्त्यावरून चालणाऱ्या गरीब मुलाला रॉटव्हेलर जातीच्या कुत्र्यांनी लक्ष्य केले.

त्यामुळे या मुलांना काही दिवस दवाखान्यात उपचार घ्यावा लागला. याची गंभीर दखल घेत पशुसंवर्धन खात्याने उपद्रवी ठरणाऱ्या कुत्र्यांवर कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी महापौर रोहित मोन्सेरात, रोटरी क्लब मिरामारच्या अध्यक्ष सोनाली नागवेकर, पशुसंवर्धन संचालक डॉ ऑगुस्टिनो मिस्किता उपस्थित होते.

रेबिजमुळे २० हजार मृत्यू

देशात २० हजार मृत्यू हे रेबिजमुळे होतात. प्राण्यांमधून माणसाला संकरित होणारा हा रोग म्हणजे मोठे आव्हान आहे. २०१४ पासून गोव्यात ‘मिशन रेबिज’ प्रकल्प सुरू आहे. गेली सहा वर्षे गोव्यात रेबिजच्या एकही रुग्ण मिळालेला नाही.

आता नेपाळ, फिलीपीन्स असे आशियाई देश तसेच केरळ हे राज्य आणि बंगळुरू, मुंबई अशी महानगरे गोव्यातील यशस्वी मोहीमेबाबत उत्सुकता दाखवत आहेत, अशी माहिती मिशन रेबिजचे संचालक डॉ. मुरूगन अप्पुपिल्लई यांनी दिली.

रेबीज जागृती आणि मायक्रो चिप

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘पर्पल अप पेटस ऑफ पणजी’ या प्रकल्पासाठी सामुदायिक कुत्रे नोंदणी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी दोन भटक्या कुत्र्यांना मायक्रो चीप बसवण्यात आली. तसेच कुत्रा जागृती चित्ररथ असलेल्या विद्यार्थ्यांच्या मिरवणुकीला झेंडा दाखवून प्रारंभ केला.

'ह्या' आहेत हिंसक जाती

हिंसक जातींमध्ये रॉटविलर, पिटबुल, डॉबरमन, अमेरिकन/ स्टॅफोर्डशायर बुल टेरियर, बुली कुट्टा, डॉग्गो अर्जेंटिनो, बेल्जियन मालिनॉइस, दक्षिण आफ्रिकन बोअरबोएल, कॉकेशियन शेपर्ड, फिला ब्रासिलिया, तिबेटी मास्टिफ या जातींचा समावेश आहे.

"कुत्र्यांना योग्य त्या वेळी प्रशिक्षणाची गरज असते. ते प्रशिक्षण मिळाले तर कुत्री अधिक आक्रमक होत नाहीत. मोठ्या जातीच्या कुत्र्यांना नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते."

ॲड. शर्वाणी पित्रे - ॲनिमल किंगडम

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॅटरीचा राजा येतोय! Redmi 15 5G लाँचिंगसाठी सज्ज, 7000mAh बॅटरी करणार कमाल; जाणून घ्या अफलातून फीचर्स

IND vs ENG: भारतासाठी ओव्हल 'लकी' की 'अनलकी'? कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? गिल सेना करणार मोठा चमत्कार

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Lung Cancer: फुफ्फुसाच्या कर्करोगाचा तरुणाईला विळखा, 50 वर्षांखालील 21 टक्के लोकांना जखडलं; जाणून घ्या का वाढतोय धोका?

Goa Assembly: गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात वाढ, जून 2025 पर्यंत 54.5 लाख पर्यटकांची नोंद, मंत्री रोहन खंवटेंची माहिती; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT