Zuari Bridge: नवीन झुआरी पुल अंतिम टप्प्यात; दिवाळीपूर्वी पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता

Zuari Bridge: तसेच पुलाच्या दुसऱ्या विभागाचा बंद भाग लवकरच बसवला जाईल
Zuari Bridge
Zuari BridgeDainik Gomatak
Published on
Updated on

Zuari Bridge: नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या चौपदरी विभागाचे काम प्रगत टप्प्यात असून, दिवाळीपूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. तसेच पुलाच्या दुसऱ्या विभागाचा बंद भाग लवकरच बसवला जाईल

Zuari Bridge
Chhatrapati Shivaji Maharaj: राज्यात उद्यापासून ‘शिवशौर्य यात्रे’चे आयोजन

बहुप्रतिक्षित नवीन झुआरी केबल स्टेड पुलाची दुसरी लेन नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस वाहतुकीसाठी कार्यान्वित होईल. जुलैमध्ये गोव्यातील खराब हवामानामुळे पुलाचे काम काही काळ थांबले होते, अशी माहिती दिलीप बिल्डकॉनचे स्ट्रक्चरचे उपाध्यक्ष अतुल जोशी यांनी दिली.

Zuari Bridge
Goa GMC: गोमेकॉत इफिकॉन’ परिषद आरोग्यंत्र्यांच्या हस्ते उद्‍घाटन

गोमंतक’ने दिलीप बिल्डकॉनचे स्ट्रक्चरचे उपाध्यक्ष अतुल जोशी यांच्याशी संपर्क साधला आणि नवीन झुआरी केबल स्टेड ब्रिजच्या दुसऱ्या लेनच्या प्रगतीची माहिती घेतली असता, जोशी यांनी सांगितले की, दुसऱ्या लेनचे थोडेच काम शिल्लक आहे. या पुलाच्या चार सेगमेंट लिफ्टिंगचे काम सप्टेंबरमध्ये पूर्ण होईल. दुसऱ्या लेन केबल स्टेड ब्रिजचे काम नोव्हेंबरअखेर पूर्ण होईल आणि ही बाजू प्रवाशांसाठी खुली केली जाईल.

पावसामुळे कामास उशीर

जोशी यांनी सांगितले की, जुलै महिन्यात मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा यामुळे क्रेन व इतर अवजड यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मोठे काम करणे कठीण झाले होते. पावसात समुद्र खवळलेला असल्याने कामाच्या गतीवर परिणाम झाला. दुसऱ्या लेनचे जवळपास ९७ टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com