'मी अशा पुरुषाच्या शोधात’; ऑनलाईन अश्लील जाहिरातीला बळी पडला अन् लाखो रुपये गमावले

Pune Cyber Crime: संपर्क केल्यानंतर समोरुन त्याला सदस्य नोंदणी, गोपनीयतेच्या नावाखाली त्याच्याकडून सुरुवातीला काही रक्कम घेण्यात आली.
Online Scam News
Pune Cyber CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऑनलाईन अश्लील जाहिरातीला बळी पडलेल्या व्यक्तीने तब्बल ११ लाख रुपये गमावले आहेत. सायबर गुन्हेगारांचा शिकार ठरलेला हा व्यक्ती व्यवसायाने ठेकेदार असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांचा शिकार ठरलेल्या या व्यक्तीने एक ऑनलाईन जाहीरात पाहिली होती. या जाहिरातीत ‘मला गरोदर करेल अशा पुरुषाच्या मी शोधात आहे’, अशा आशय देण्यात आला होता. ही जाहीरात पाहून त्याने त्याने दिलेल्या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधला.

Online Scam News
Valvanti River Flood: नोव्हेंबरमध्ये आला गोव्यातील नदीला पूर; साखळीत वाळंवटी ओव्हरफूल

संपर्क केल्यानंतर समोरुन त्याला सदस्य नोंदणी, गोपनीयतेच्या नावाखाली त्याच्याकडून सुरुवातीला काही रक्कम घेण्यात आली. यानंतर सातत्याने वेगवेगळ्या कारणांसाठी त्याच्याकडून पैसे उकळण्यात आले. असे करुन त्याने एकूण ११ लाख रुपये सायबर गुन्हेगारांना दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

समोरून प्रतिसाद येण्याचा बंद झाल्यानंतर या व्यक्तीला त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आले व त्याने पोलिसांत धाव घेतली. आर्थिक फसवणूक झालेल्या व्यक्तीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करुन तपास सुरु केला आहे. दरम्यान, नागरिकांनी अशा आमिषांना बळी पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Cyber Crime
online investment fraud arrested
woman blackmailed with obscene photos
Fake call centers in Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com