G20 शिखर परिषद 2023 भारतात होणार आहे, या शिखर परिषदेच्या कार्यक्रमाचे आयोजन गोव्यात करण्यात यावे अशी विनंती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. यानुसार पंतप्रधान मोदींनी गोव्याला संधी मिळणार असल्याचे म्हटले होते. या शिखर परिषदेतील एक बैठक गोव्यात पार पडणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
(CM Pramod Sawant say Goa all set to welcome delegates of G20 states)
या बैठकिबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, भारतात होणाऱ्या G20 शिखर परिषद सदस्यांचे स्वागत करण्यास गोवा सज्ज आहे. 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत शिखर परिषद पार पडणार आहे. याचे अध्यक्षपद भारताकडे असणार आहे.अशी माहिती देखील त्यांनी दिली.
प्रमुख आंतरराष्ट्रीय आर्थिक मुद्द्यांवर आले एकत्र
G20 हा गट आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्यासाठी एकत्र आलेल्या 19 देशांचा सहभाग असलेला मंच आहे. प्रमुख आंतरराष्ट्रीय आर्थिक मुद्द्यांवर जागतिक वास्तुकला आणि प्रशासन सहकार्यासाठी आणि मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका हा गट बजावतो.
G20 गटात 19 देशांचा समावेश
G20 गटात 19 देशांचा समावेश आहे. त्यामध्ये भारत, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश होतो.तर या अंतर्गत भारतात पार पडणाऱ्या या शिखर परिषदेच्या बैठकांमधील एक बैठक गोव्यात आयोजित करण्यात येणार असल्याने यामुळे गोव्याला पर्यटनाच्या अंगाने फायदा होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.