CM Pramod Sawant On Dr. Ambedkar Jayanti  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: आंबेडकर जयंती राज्य सोहळा म्हणून साजरी करणार; पर्वरीत पुढील वर्षात आंबेडकर भवन

मुख्यमंत्र्यांची घोषणा; जयंतीनिमित्त अभिवादन

Akshay Nirmale

CM Pramod Sawant On Dr. Ambedkar Jayanti: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आत्तापर्यंत काही संघटना आणि समाज कल्याण मंत्रालयातर्फे साजरी केली जात होती.

पण यापुढील काळात आंबेडकर जयंती राज्याचा सोहळा म्हणून साजरी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

पाटो येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आंबेडकर जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यावेळी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी आंबेडकरांची प्रेरणा घेऊन कार्यरत असलेल्या चौघा जणांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय समाजकल्याण मंत्रालयातर्फे विविध शिष्यवृत्तींचे वाटप आणि इतर काही जणांचे सन्मानही झाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचा विषय याबाबतच्या समितीने लावून धरलेला आहे. त्यात मंत्र्यांसह कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या भवनासाठी जागा घेतली होती पण तांत्रिक कारणामुळे ती जागा बदलावी लागली.

पण पर्वरीतीच नवीन जागा घेतली आहे. लवकरात लवकर येथे पुढच्या वर्षभरात आंबेडकर भवन बांधणार. या भवनात पेडण्यापासून ते काणकोणपर्यंतचे जे विद्यार्थी शिक्षणासाठी येणार आहेत, त्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोयही येथील हॉस्टेलमध्ये करण्याचे नियोजन आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT