CM Pramod Sawant: अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवली 169.53 कोटींची संपत्ती; मुख्यमंत्र्यांची माहिती

अग्निशमन सेवा दिनानिमित्त कार्यक्रम
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant on Fire Department: राज्यात या वर्षात आगींच्या घटनांमध्ये सुमारे 81 कोटींचे नुकसान झाले आहे. तर 169.53 कोटी रूपयांच्या मालमत्तेचे आगीपासून संरक्षण करण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे, अशी माहिती, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

अग्निशमन सेवा दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

CM Pramod Sawant
Goa Work Place Harrasment: 65 वर्षीय व्यवस्थापकाकडून सहकारी तरूणीचा लैंगिक छळ; गोव्यात खासगी कंपनीतील प्रकार

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, डिरेक्टोरेट ऑफ फायर अँड इमर्जन्सी सव्हिर्सेसला गतवर्षात 7 हजाराहून अधिक कॉल्स आले होते. त्यातील 9 कॉल फेक होते. आगींच्या घटनांमध्ये 10 मृत्यू झाले होते. 7 जणांचा जीव वाचवण्यात यश आले आहे.

डिरेक्टोरेट ऑफ फायर अँड इमर्जन्सी सव्हिर्सेसला आयएसओ मानांकन मिळाले. ऑक्युपेशनल हेल्थ सर्टिफिकेशन मिळाले, ही अभिमानाची बाब आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात गेल्या काही काळात दोन महत्वांच्या आगींच्या घटना घडल्या. एकतर बर्जर पेंट कंपनीला लागलेली आग.

तिथे मालमत्तेचे नुकसान झाले असले तरी जीवीतहानी टाळण्यात आपण यशस्वी झालो. 24 तास अधिकारी तिथे कार्यरत होते. दुसरी महत्वाची घटना म्हणजे जंगलात लागलेल्या आगीच्या घटना.

CM Pramod Sawant
Goa Tourist Accident: गोव्यात वाढदिवसासाठी आलेले कुटूंब; कारची चुकली वाट अन् अपघातात आईचा झाला मृत्यू...

पेडण्यापासून काणकोणपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या कारणांनी जंगलात आगींच्या घटना घडल्या. जंगलातील आगी विझविण्यासाठीही सरकारने युद्धपातळीवर काम केले.

यात फायरब्रिगेड जवानांपासून ते मंत्री, अधिकाऱ्यांपर्यंतचे घटक कार्यरत होते. त्या सर्वांचे अभिनंदन, आभार. आम्ही नवीन 189 फायर फायटर्सची भरती केली आहे. आपदा मित्र, आपदा सखी यांनाही प्रशिक्षण दिले आहे. त्यांचा वापर संपुर्ण गोव्यात केला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com