Goa coal policy protest Dainik Gomantak
गोवा

"कोळसा वाढणार असे स्वप्न कोणाला पडलेय?", विरोधकांच्या आंदोलनानंतर CM सावंतांचा 'कमबॅक'

Goa Anti-Coal Movement: संपूर्ण विरोधी पक्षाने एकजूट दाखवल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले

Akshata Chhatre

मडगाव: गोव्यात कोळसा हाताळणीच्या धोरणांवरून राज्य सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय संघर्ष सुरूआहे. कोळसा धोरणांविरोधात 'गोंयात कोळसो नाका' या संघटनेने ९ नोव्हेंबर २०२५ रोजी मडगाव येथील लोहिया मैदानावर भव्य जन-जागृती सभेचे आयोजन केले होते, ज्यात संपूर्ण विरोधी पक्षाने एकजूट दाखवली, यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले.

"कोळसा हाताळणी एक टनही वाढणार नाही!" - मुख्यमंत्री

या आंदोलनानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने स्पष्टीकरण देत विरोधकांचे आरोप फेटाळले. कोळसा हाताळणी वाढवण्याबद्दल पसरलेल्या अफवा निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, " काल लोहिया मैदानावर झालेली ती बैठक कोळशाबद्दल होती की कशाबद्दल, हे मला माहीत नाही. गोव्यात कोळसा हाताळणी पूर्वीप्रमाणेच आहे. कोळसा हाताळणी वाढणार असे कोणाला स्वप्न पडले, हे मला माहीत नाही. भारत सरकारने किंवा गोवा सरकारने कोळसा हाताळणी वाढवण्याबद्दल कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही."

मुख्यमंत्री सावंत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले, "मी पुन्हा सांगतोय, गोव्यात कोळसा हाताळणीची क्षमता एका टनानेही वाढवली जाणार नाही. मुरगाव पोर्ट ट्रस्टची जी क्षमता पूर्वी होती, तीच कायम राहील." तसेच, विरोधक निवडणुका जवळ आल्यामुळे हे राजकारण करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

लोहिया मैदानावर विरोधी पक्षांची एकजूट

राज्य सरकारच्या कोळसा धोरणांविरोधात 'गोंयात कोळसो नाका' संघटनेने केलेल्या आंदोलनात प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सहभाग घेतला. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी या आंदोलनात सहभागी होत गोव्याचे पर्यावरण वाचवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

विरोधी पक्षनेते यूरी आलेमाव, अ‍ॅड. कार्लोस फरेरा, विरेश बोरकर, वेन्झी व्हिएगास, क्रुझ सिल्वा, आमदार मनोज परब, गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस (संघटन) दुर्गादास कामत यांच्यासह नगरसेवक आणि माजी नगरपालिकेच्या अध्यक्षांनीही आंदोलनात भाग घेतला. या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन लोहिया मैदानावर जोरदार घोषणाबाजी करत सरकारवर कोळसा लॉबीला पाठिंबा देत असल्याचा आरोप केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

30 कोटी रुपयांची फसवणूक, चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांना अटक; मनोरंजन विश्वात खळबळ!

Crime News: 13 वर्षीय मुलीने गळफास घेत संपवलं जीवन, वडिलांचा शाळेतील विद्यार्थ्यावर गंभीर आरोप; वाचा संपूर्ण प्रकरण

'मृतदेह घरी पोहोचवा, क्लब मालकांकडून आर्थिक मदत मिळवून द्या', मृतांच्या मित्रांचा एल्गार

"मैं नहीं खाउंगा, मोटा हो जाउंगा" जयस्वाल केक घेऊन आला, पण 'हिटमॅन'ने दिला नकार Watch Video

Goa Politics:"सकाळी येतो सांगून तुकाराम आलाच नाही!", RGP प्रमुखांनी काँग्रेसला पुन्हा टाळले? युतीचा 'सस्पेन्स' वाढला

SCROLL FOR NEXT