गोवा बचाव! विरोधी पक्षातील नेते, सामाजिक कार्यकर्ते लोहिया मैदानावर एकवटणार; शनिवारी मडगावात कोळसा विरोधी आंदोलन

Goa Anti-Coal Movement: राज्य सरकारच्या कोळसा धोरणांविरोधात 'गोंयात कोळसो नाका' या संघटनेने शनिवारी मडगाव येथील ऐतिहासिक लोहिया मैदानावर भव्य जन-जागृती सभेचे आयोजन केले.
Goa Anti-Coal Movement
Goa Coal ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यात कोळसा विरोधी आंदोलन पुन्हा एकदा तीव्र होणार आहे. राज्य सरकारच्या कोळसा धोरणांविरोधात 'गोंयात कोळसो नाका' या संघटनेने शनिवारी (1 नोव्हेंबर 2025) सायंकाळी 5 वाजता मडगाव येथील ऐतिहासिक लोहिया मैदानावर भव्य जन-जागृती सभेचे आयोजन केले आहे. या सभेला तमाम गोमंतकीयांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

या आंदोलनाला सामाजिक कामकाज हाताळणारा चर्चचा विभाग असलेल्‍या कौन्‍सिल फॉर सोशल जस्टिस ॲण्‍ड पीस संघटनेनेही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. एवढचं नव्हतेर, सावंत सरकारच्या कोळसा धोरणांविरोधात विरोधकांनीही कंबर कसली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार विजय सरदेसाई (Vijai Sardesai) आणि मनोज परब यांनीही यास आपला पाठिंबा दर्शवला आहे.

Goa Anti-Coal Movement
Goa Coal Issue: 'गोंयात कोळसो नाका'! मडगावात  समविचारी एकवटले; 100हून अधिक पंचायती कोळशाविरुद्ध

मुरगाव बंदरात जादा कोळसा हाताळण्‍यासाठी जिंदाल कंपनीला सरकारने दिलेली मान्‍यता, गोव्‍यातील रस्‍त्‍यांचा मोठ्या प्रमाणावर हाती घेतलेला विस्‍तार, नवीन बोरी पुल आणि गोव्‍यात सुरु करण्‍यात येणाऱ्या नवीन जेटी हे सारे प्रकल्‍प फक्‍त कोळसा वाहतुकीला फायदा व्‍हावा यासाठी हाती घेण्‍यात आले असून सरकारचे हे कारस्‍थान लोकांसमोर आणण्‍यासाठी आम्‍ही शनिवारी या सभेचे आयोजन केले आहे, अशी माहिती गोयात कोळसो नाका या संघटनेचे सहनिमंत्रक अभिजित प्रभुदेसाई यांनी दिली.

Goa Anti-Coal Movement
Goa Coal Handling: दक्षिण गोव्यात ‘कोळसा’ वाढणार! सिमोईस यांची भीती; वास्को-होस्‍पेट रेल दुपदरीकरणाला विरोध कायम

तसेच, आमदार विजय सरदेसाई यांनीही सरकारला धारेवर धरत गोमंतकीयांना 'गोंयात कोळसो नाका' संघटनेकडून आयोजित सभेला मोठ्यासंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी सरदेसाई म्हणाले की, ''हा फक्त एक मेळावा नाही, तर गोव्याची (Goa) ओळख, भूमी आणि भविष्याचे रक्षण करण्यासाठीचा हा एक मोर्चा आहे. चला एकत्र येऊन आवाज उठवूया, कारण जर आपण आज गप्प राहिलो तर उद्या गोव्याचे रक्षण करण्यासाठी कोणीही राहणार नाही.''

Goa Anti-Coal Movement
Mormugao Coal: मुरगावची कोळसा प्रदूषणापासून सुटका होणार? कंपन्यांनी योजले प्रदूषण नियंत्रणाचे उपाय; ‘जेएसडब्ल्यू’ने उभारला डोम

सरदेसाई पुढे म्हणाले, ''गोव्यात कोळशाची वाहतूक वाढली तर गोव्यातील पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पर्यटन उद्योगावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे गोव्यात कोळशाची हाताळणी वाढवू नका अशी मागणी आंदोलक करत आहेत, पण कोळसा माफियांच्या अधीन गेलेले हे सरकार ते मान्य करत नाही.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com