CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्र्यांनी करुन दाखवलं, ग्रामसेवकावर Strict Action; सरदेसाईंकडून प्रमोद सावंतांचे कौतुक, रायच्या 'सायको' सचिवाचीही केली तक्रार

Goa Assembly Monsoon Session 2025: रायचा सचिव अमृत साकळकर हा सायको आहे, तो स्वत:चेच कपडे फाडून दुसऱ्यावर फेकतो आणि त्यांच्याविरोधात तक्रार करतो.

Pramod Yadav

पर्वरी: सांकवाळचा वादग्रस्त ग्रामसेवस ऑर्विले वालीस याला एसीबीच्या चौकशी अहवालानंतर निलंबित करण्यात आले आहे. याबाबत विरोधकांनी कारवाईची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाई केल्याबाबत विजय सरदेसाईंनी सोमवारी सभागृहात प्रमोद सावंत यांचे अभिनंदन केले. त्याचवेळी त्यांनी रायच्या सचिवाची देखील तक्रार केली.

सांकवाळचा ग्रामसेवक ऑर्विले वालीस याच्याविरोधात एसटी अट्रॉसिटी, छळवणूक यासारखे आरोप झाले होते. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही केली होती. त्या ग्रामसेवकाला निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे, त्याबाबत मी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो, असे सरदेसाई म्हणाले.

आम्ही विरोधात आहोत सरकारच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांना चांगलच म्हणालयला हवं तसेच, ज्या चुकीच्या आहेत त्याला विरोधही करायला हवा, असे सरदेसाई पुढे म्हणाले.

विजय सरदेसाई यांनी यावेळी राय पंचायतीच्या सचिवाची देखील तक्रार केली. रायचा सचिव अमृत साकळकर हा सायको आहे, तो स्वत:चेच कपडे फाडून दुसऱ्यावर फेकतो आणि त्यांच्याविरोधात तक्रार करतो. पंचावर देखील केस दाखल करतो, अशा लोकांची किमान बदली तरी करावी, अशी मागणी सरदेसाईंनी केली.

दक्षता विभागाकडे याबाबत काही तक्रार आहे का, हे तपासून प्रक्रियानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी दिले.

दरम्यान, सांकवाळच्या ग्रामसेवक ऑर्विले वालीस यांच्या विरोधात एसीबीच्या चौकशी अहवालानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पंचायत संचालनालयाने त्याला निलंबित केले आहे. ऑर्विले वालीस हा ग्रामसेवक सांकवाळ पंचायतीचा सचिव म्हणून काम पाहत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Trafficking: गोवा पोलिसांची धडक कारवाई! स्विगी डिलिव्हरी एजंटला ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक; 'इतक्या' हजारांचा गांजा जप्त

AUS vs SA: इतिहास घडला...! ऑस्ट्रेलियाच्या 22 वर्षीय पठ्ठ्यानं दक्षिण आफ्रिकेची तगडी फलंदाजी केली ध्वस्त; मोडला 38 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral Video: 'मत रो मेरे दिल...'! दारुच्या नशेत पकडल्यावर पठ्ठ्याला बायकोची आठवण, गाण्याला पोलिसानंही दिली साथ; व्हिडिओ एकदा बघाच

AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव! ऑस्ट्रेलियाने मोडला भारताचा कीर्तिमान; हेड, मार्श अन् कॅमेरुनची वादळी शतके

Congress MLA Arrested: 12 कोटी कॅश, 6 कोटींचं सोनं... मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक, ईडीची कारवाई

SCROLL FOR NEXT