Pramod Sawant And Manohar Parrikar  Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: भाई, तुमचें आनीक एक सपन पुराय जाता! मुख्यमंत्र्यांची पर्रीकरांना श्रद्धांजली

Pramod Yadav

गोव्यात नव्याने उभारण्यात आलेल्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Mopa International Airport) आज (रविवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटन केले जाणार आहे. 2016 साली पायाभरणी झालेल्या या विमानतळ 06 जानेवारीपासून लोकांच्या सेवेत सक्रिय होणार आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्यासाठी महत्वकांक्षी असलेल्या विमानतळाला मनोहर पर्रीकर यांचेच नाव देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मोपा विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी मनोहर पर्रीकर यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. "भाई, आम्ही नेहमी तुमचे स्मरण करतो. आज तुमचे आणखी एक स्वप्न पूर्ण होत आहे. तुमचा आशिर्वाद आम्हाला आणि समस्त गोमन्तकीयांना उर्जा देत राहो. तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली." अशा शब्दात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मनोहर पर्रीकरांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दरम्यान, अत्याधुनिक, सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या मध्यवर्ती संकल्पनेवर उभारण्यात आलेल्या मोपा विमानतळासाठी सुमारे 2,870 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात या विमानतळावर दर वर्षी 4.4 दशलक्ष प्रवाशांची ये-जा क्षमता असेल, ती टप्प्याटप्प्याने वाढून 33 दशलक्ष होण्याची शक्यता आहे. जानेवारीत जवळपास 200 विमान या विमानतळावर उतरतील असा अंदाज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

Mhadei Water Dispute: 'म्हादई'बाबत चुकीची माहिती नको! नेरसे येथे जलवाहिनीचे काम सुरु नाही

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

SCROLL FOR NEXT