CM Pramod Sawant Delhi Visit Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: मंत्रीमंडळ विस्तार नाही तर या कारणासाठी दिल्ली दौरा; मुख्यमंत्र्यांनी स्वतःच सांगितले कारण...

श्रावणी सोमवारनिमित्त गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल (सोमवार) वाराणसीच्या बाबा विश्वनाथचे दर्शन घेतले

Kavya Powar

CM Pramod Sawant Delhi Visit: श्रावणी सोमवारनिमित्त गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल (सोमवार) वाराणसीच्या बाबा विश्वनाथचे दर्शन घेतले. त्यांनी तिथे गंगाजल आणि दुधाचा अभिषेक करण्याबरोबरच षोडशोपचार पद्धतीने बाबा विश्वनाथांची पूजा केली.

काल वाराणसीवरून ते दिल्लीला रवाना झाले होते. मुख्यमंत्री दिल्लीत पोचल्यावर त्यांनी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. व्ही. सतीश यांनी नोंदवलेली निरीक्षणे आणि लोकसभा निवडणूक तयारीसंदर्भात ही चर्चा झाली. या भेटीदरम्यान मंत्रिमंडळ फेरबदलाविषयी चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज गोव्यात परतल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, 'मी वाराणसीमध्ये श्रावणी सोमवारनिमित्त संपूर्ण गोवेकरांच्यावतीने बाबा विश्वनाथचे दर्शन घेतले आणि राज्याच्या हितासाठी प्रार्थना केली. '

यावेळी मंत्रीमंडळ विस्तार, राज्यात सध्या चर्चेचा मुद्दा बनलेले कथित सेक्स स्कॅंडल प्रकरण आणि गोवा विद्यापीठातील विद्यार्थिनींवरील अत्याचारप्रकरणी मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की, मी दिल्लीला माझ्या वैयक्तिक कारणासाठी गेलो होतो. सेक्स स्कॅंडल आणि गोवा विद्यापीठ प्रकरणाबाबत चौकशी सुरू आहे. याबाबत जसजशी माहिती येईल ती आम्ही तुम्हाला देऊ.

यावेळी राज्यातील या महत्वाच्या विषयांवर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर बोलणे टाळले असल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT