Amit Shah, CM Pramod Sawant  X
गोवा

Goa Cabinet: मुख्यमंत्री सावंतांनी घेतली अमित शहांची भेट, गोव्यात राजकीय चर्चांना उधाण; मंत्रिमंडळ फेरबदलाला पुन्हा चालना?

Goa Politics: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. त्‍यामुळे राजकीय हालचालींना गती मिळाल्याचे बोलले जात आहे.

Sameer Panditrao

Amit Shah CM Pramod Sawant Visit

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. त्‍यामुळे राजकीय हालचालींना गती मिळाल्याचे बोलले जात आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, ते मात्र समजू शकले नाही.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून या भेटीचे छायाचित्र उपलब्ध करण्यात आले आहे. या सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विविध उपक्रमांची माहिती शहा यांना दिली व त्यांचे मार्गदर्शन घेतले. गेले काही महिने मंत्रिमंडळ फेरबदलाचा विषय चर्चेत आहे. मात्र दिल्लीतील नेत्यांनी या विषयाला प्राधान्य न दिल्याने तो विषय मागे पडला होता.

सध्‍या दिल्लीच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पाठोपाठ आज शहा यांची भेट घेतली. दिल्ली निवडणुकीत भाजपचे पक्षश्रेष्ठी व्यस्त असल्याने ते एवढ्यात राजकीय चर्चेसाठी भेट देणार नाहीत असे समजून भाजपकडून तो विषय चर्चेला येणार नाही याची दक्षता घेण्यात येत होती. माजी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सुरवातीला मंत्रिमंडळ बदल हवा, अशी भूमिका घेतली होती. परंतु तो होत नसल्याचे दिसल्यावर त्यांनीही ‘सर्व मंत्री चांगले काम करताहेत’ असा राग आळवणे सुरू केले होते.

दामू नाईक यांची भूमिका महत्त्‍वपूर्ण

नव्याने प्रदेशाध्यक्षपदी आलेले दामू नाईक यांची याबाबत स्पष्ट मते आहेत. पक्षशिस्तीमुळे त्यांनी ती बोलून दाखवली नसली तरी मुख्यमंत्र्यांना त्‍याबाबत कल्पना आहे. त्यामुळेच त्यांनी मंत्रिमंडळ फेरबदल विषयाला पुन्हा चालना दिल्याचे मानले जात आहे. शहा यांच्यासोबत केवळ विकासकामांवर चर्चा झाली यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. या भेटीत राजकीय चर्चा होणारच. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळ फेरबदल हा आता अटळ मानला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT