CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: कामे न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणार; मुख्यमंत्री सावंतांचा इशारा

Pramod Sawant Visit: मुख्यमंत्र्यांनी आज कौशल्य विकास संचालनालयाला अचानक भेट दिली आणि तेथील कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यातील सरकारी कार्यालयांत लोकांची कामे होतात की नाहीत, हे तपासण्यासाठी सरकारी कार्यालयांना यापुढे अचानक भेट देण्यात येईल. कामे न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. कोणाचीही गय केली जाणार नाही. यात निलंबन, बडतर्फीसह सर्व कारवायांचा समावेश असेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज रात्री ‘गोमन्तक’ला सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आज कौशल्य विकास संचालनालयाला अचानक भेट दिली आणि तेथील कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, आठवड्यातून एकदा साखळी येथे मी जनतेसाठी उपलब्ध असतो. सुरवातीला साखळीचा आमदार म्हणून तेथील जनतेला मी आठवड्यातून एकदा उपलब्ध असावा, अशी संकल्पना होती.

मात्र, आता राज्यभरातून लोक आपली कामे घेऊन येतात. त्या कामांचे स्वरूप पाहिले तर सरकारी कर्मचारी कामेच करत नसल्यामुळे कामे प्रलंबित राहात असल्याचे दिसून आले. सरकारी कर्मचाऱ्यांनी वेळेवर कामावर पोचले पाहिजे. पूर्णवेळ कार्यालयात असले पाहिजे. असे होताना दिसत नाही. मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडे समस्या घेऊन येणाऱ्यांची संख्या घटेपर्यंत ही मोहीम सुरूच राहणार आहे.

अनेकदा खातेप्रमुखच बेशिस्तीसाठी कारणीभूत असतात, असे सांगून मुख्यमंत्री म्‍हणाले की, ज्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयात काम न करता प्रत्यक्षात गावात जाऊन कामे करणे अपेक्षित असते, अशा कर्मचाऱ्यांना खातेप्रमुख कार्यालयात कामे देतात. असे कर्मचारी कार्यालयात बसलेले आढळतात. आज कौशल्य विकास संचालनालयात भेट दिली असता तेथेही माझ्या नजरेस बऱ्याच गोष्टी पडल्या आहेत. त्यांना वाटत असेल मुख्यमंत्र्यांना कोणत्या कर्मचाऱ्याचे काय काम हे बहुधा ठाऊक नसावे. आज पहिलीच भेट होती म्हणून कारवाईपर्यंत मजल मारली नाही; पण यापुढे गय केली जाणार नाही.

मुख्य कार्यालयात बसून वेळकाढूपणा करू नये. यापुढे अशा कामचुकार कर्मचाऱ्यांना आणि त्यांना असे करण्यास मुभा देणाऱ्या खातेप्रमुखांवर कारवाई केली जाणार आहे.

मी केवळ माझ्याच खात्यातील कार्यालयांना नव्हे, तर सर्व मंत्र्यांच्या खात्यांतर्गत येणाऱ्या कार्यालयांना भेटी देणार आहे. मंत्रीही कार्यालयांना भेटी देऊन कामचुकारांवर कारवाई करतील अशी अपेक्षा आहे.

जनतेची कामे वेळच्या वेळी झाली तर जनतेची गाऱ्हाणीच शिल्लक राहणार नाहीत. जनता दरबारांत समस्यांची यादी वाचली जाणार नाही असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, केवळ फाईल नाचविल्या म्हणजे सरकारी काम नव्हे. सरकारी कर्मचारी म्‍हणजे जनसेवक आहेत. त्यांनी लोकांची कामे लवकर कशी होतील, असे पाहिले पाहिजे. एखादा कर्मचारी रजेवर असेल तर दुसऱ्याकडे ताबा असतो. त्यावेळी जनतेपैकी कोणी आपले काम कुठवर आले हे पाहण्यासाठी आले तर तो कर्मचारी रजेवर आहे, असे थेट सांगितले जाते.

मी केवळ माझ्याच खात्यातील कार्यालयांना नव्हे, तर सर्व मंत्र्यांच्या खात्यांतर्गत येणाऱ्या कार्यालयांना भेटी देणार आहे. मंत्रीही कार्यालयांना भेटी देऊन कामचुकारांवर कारवाई करतील अशी अपेक्षा आहे.

जनतेची कामे वेळच्या वेळी झाली तर जनतेची गाऱ्हाणीच शिल्लक राहणार नाहीत. जनता दरबारांत समस्यांची यादी वाचली जाणार नाही असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, केवळ फाईल नाचविल्या म्हणजे सरकारी काम नव्हे. सरकारी कर्मचारी म्‍हणजे जनसेवक आहेत. त्यांनी लोकांची कामे लवकर कशी होतील, असे पाहिले पाहिजे. एखादा कर्मचारी रजेवर असेल तर दुसऱ्याकडे ताबा असतो. त्यावेळी जनतेपैकी कोणी आपले काम कुठवर आले हे पाहण्यासाठी आले तर तो कर्मचारी रजेवर आहे, असे थेट सांगितले जाते.

कार्यक्षमता वाढविण्याची गरज

शुक्रवारी कौशल्य व उद्योजकता विकास संचालनालयाच्या मुख्य कार्यालयात कामकाजाची तपासणी केली. या भेटीवेळी माझ्या नजरेस अनेक गोष्टी आल्या आहेत. त्याची आता जाहीर वाच्यता करत नाही. कार्यक्षमता वाढवण्याची गरज मी तेथे अधिकारी, कर्मचाऱ्यांची संवाद साधताना अधोरेखित केली आहे. यातून ते योग्य तो धडा घेतील, अशी अपेक्षा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

‘सरकारी नोकरी म्हणजे मजा’

अनेक ठिकाणी ‘सरकारी नोकरी म्हणजे मजा’ असे समीकरण बनले आहे. लोक आपल्या कामांसाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारतात. लोकांना हे सरकार आपले वाटण्यासाठी त्यांची कामे वेळच्या वेळी झाली पाहिजेत. सरकार वेतन काम करण्यासाठी देते आणि कामे न केल्यास कारवाईस सामोरे जावे लागते, याची जाणीव कर्मचाऱ्यांना कृतीतून करून दिली जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

...म्हणून ‘कौशल्य विकास’ला भेट

मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी कौशल्य व उद्योजकता विकास संचालनालयाच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. त्यांची ही भेट पूर्वनियोजित नव्हती. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की कौशल्य व उद्योजकता विकासावर सरकारचा भर आहे. सरकार अनेक निर्णय घेत असते. त्या निर्णयांची अंमलबजावणी किती प्रामाणिकपणे होते याची तपासणी होणे आवश्यक होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT