CM Pramod Sawant: ''नीट पेपरफुटीचा गोव्यातील विद्यार्थ्यांवर परिणाम होणार नाही''; मुख्यमंत्री सावंत असं का म्हणाले?

Goa Assembly: नीट पेपर फुटीच्या मुद्यावरुन अधिवेशनात विरोधकांनी सावंत सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला.
CM Pramod Sawant: ''नीट पेपरफुटीचा गोव्यातील विद्यार्थ्यांवर परिणाम होणार नाही''; मुख्यमंत्री सावंत असं का म्हणाले?
CM Pramod SawantX Social Media
Published on
Updated on

नीट पेपर फुटीच्या मुद्यावरुन अधिवेशनात विरोधकांनी सावंत सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एकएक करुन उत्तरे दिली. राज्यातून उच्च शिक्षण घेतलेले विद्यार्थी गोवा महाविद्यालयात राज्य कोट्यातूनच प्रवेश घेतात. त्यामुळे नीट पेपर फुटीचा राज्यातील विद्यार्थ्यांवर फारसा परिणाम होणार नाही, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. नीट पेपर फुटीच्या मुद्यावर आमदार कार्लोस फरेरा आणि अन्य आमदारांनी लक्ष्यवेधी सूचना उपस्थित केली होती.

राज्य कोट्यातून गोवा महाविद्यालयात राज्यातील विद्यार्थांना प्रवेश देण्यात येतो. यासाठी राज्यातून विद्यार्थ्याने सायन्समधून 12 उत्तीर्ण असणे आणि एका ठराविक काळासाठी त्याचे राज्यात वास्तव्य असणे आवश्यक आहे. यामुळे नीटच्या नव्याने जाहीर करण्यात आलेल्या निकालाचा येथील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. दिल्लीतील एम्समध्ये राज्यातून दोन-तीन विद्यार्थी प्रवेश घेतात, असे मुख्यमंत्री म्हणाले.

CM Pramod Sawant: ''नीट पेपरफुटीचा गोव्यातील विद्यार्थ्यांवर परिणाम होणार नाही''; मुख्यमंत्री सावंत असं का म्हणाले?
Goa Assembly: ''नीट परीक्षेवरुन विद्यार्थ्यांचा विश्वास उडालाय, मेडिकल आणि इंजिनिअरच्या प्रवेशासाठी आता...''; आमदार व्हिएगस आक्रमक

मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले की, ''नीट पेपर फुटीचा अशा काही विद्यार्थ्यांवर परिणाम झालेला असू शकतो. परीक्षेचा विषय हा केंद्राच्या अखत्यारीत येतो त्यामुळे राज्य सरकार यावर काहीही करु शकत नाही एनटीए, केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार काम करत आहे. केंद्र सरकारकडून प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच राज्य सरकार एमबीबीएस , बीडीएस, बीएचएमएस , नर्सिंग अशा विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करेल. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी काळजी करण्याचे काही एक कारण नाही.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com