Goa Govt Launched 170 Online Services at doorstep Dainik Gomantak
गोवा

Goa Govt Online Services: गोवा सरकारचा मोठा निर्णय, गोमन्तकीयांना घरपोच मिळणार तब्बल 170 सेवा

170 सेवा मिळणार ऑनलाईन; स्टार्टअप अंतर्गत तरुणांना रोजगाराच्या संधी

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Govt Launched 170 Online Services at doorstep: ‘ग्रामीण मित्र’ संकल्पनेद्वारे सरकारी सेवा घराघरांत पोहोचवण्यात येतील. केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी योजनेनुसार डिजिटल गोवा हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. येत्या दोन महिन्यांत याबाबत जाहीर घोषणा करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

माहिती-तंत्रज्ञान खात्याने सुरू केलेल्या सिटीझन सर्व्हिसेस सेंटरअंतर्गत आज 27 विभागांच्या 170 सेवा ऑनलाईन करण्यात आल्या. माहिती-तंत्रज्ञान खात्याने आयोजिलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पर्यटन तथा माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे, आयटी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत शेट्ये उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, "केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या योजनेतील ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘डिजिटल गोवा’ हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. राज्य सरकारने यापूर्वीच अनेक योजना ऑनलाईन केल्या असून आतापर्यंत 22 लाख ट्रांझेक्शन पूर्ण केले आहेत."

"या सर्व सुविधा ग्रामीण भागांत पोहोचवण्याबरोबरच संपूर्ण ग्रामीण भाग सरकारच्या विविध खात्यांना जोडला जात आहे. यासाठी आयटी खाते ‘हर घर फायबर’सारख्या योजना राबवित आहे. स्टार्टअप योजनेअंतर्गत राज्यातील तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी दहा लाखांपर्यंत अनुदान दिले जात असून तरुणांनी या सेवेचा लाभ घ्यावा," असे मुख्यमंत्री म्हणाले.

मंत्री खंवटे म्हणाले की, आयटी खात्याच्या वतीने राज्यात डिजिटल इंडियाअंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. ‘स्टार्टअप इंडिया’नुसार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

186 स्टार्टअप नोंदणीकृत

आयटी खात्याकडे 2018 पासून आतापर्यंत 186 स्टार्टअप नोंदणीकृत झाले असून यातील 93 लाभार्थ्यांना अनुदानाचे 2.67 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यातील 1.4 कोटी रुपये प्रत्यक्ष वितरित केले. यातील 99 लाख रुपये हे तरुण उद्योजकांना बीज भांडवल म्हणून देण्यात आले, अशी माहिती पर्यटन आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे यांनी दिली.

लवकरच ‘ग्रामीण मित्र’

आयटी खात्याच्या वतीने ‘डिजिटल गोवा अभियान’ अधिक सक्षमपणे राबवण्यासाठी ‘ग्रामीण मित्र’ नेमण्यात येणार असून या ग्रामीण मित्रांमार्फत सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील. लवकरच तालुका स्तरावर सिटीझन सर्व्हिस सेंटर उभारण्यात येणार असून याअंतर्गत या योजना कार्यान्वित होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT