Mapusa Court: न्यायाधीशांच्या वाहनाचा म्हापसा ते पर्वरी पाठलाग!

दोघे जेरबंद : न्यायालयातील कर्मचाऱ्यालाही दिली धमकी
Mapusa Court
Mapusa CourtDainik Gomantak

राज्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाकच राहिला नाही की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण आतापर्यंत सर्वसामान्यांना धमकावणाऱ्या गुन्हेगारांची मजल थेट न्यायाधीशांचा पाठलाग करणे, तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांना धमकावण्यापर्यंत गेली आहे.

एका प्रलंबित दिवाणी खटल्याशी संबंधित न्यायाधीशाच्या वाहनाचा पाठलाग करणे तसेच न्यायालयाच्या कर्मचाऱ्याला धमकावल्याबद्दल पर्वरी पोलिसांनी बुधवारी सायतो लोबो आणि झेवियर लोबो या दोघांना कळंगुटमधून अटक केली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघा संशयितांनी महिला न्यायाधीश ज्या कारमधून प्रवास करत होत्या, त्यांचा पाठलाग केला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी वरिष्ठ विभाग ‘ब’ न्यायालय म्हापसाच्या दिवाणी न्यायाधीश रिना फर्नांडिस यांनी पर्वरी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार संशयितांनी न्यायालयीन कर्मचाऱ्यांना धमकावले, त्यानंतर म्हापसा ते पर्वरीपर्यंत न्यायाधीशांच्या वाहनाचा पाठलाग केला.

याबाबत पोलिसांनी भादंसंच्या ३५३, ५०६(२) व ३४ कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. संशयित आरोपी कळंगुटमधील असल्याचे समजताच पर्वरी पोलिसांनी कळंगुट पोलिसांच्या साहाय्याने त्यांना पकडून नंतर रितसर अटक केली. गुरुवारी या दोन्ही संशयितांची जामिनावर सुटका करण्यात आली.

Mapusa Court
Goa HSSC Result 2023: विद्यार्थ्यांच्या मार्कलिस्टवरून आडनाव, पालकांची नावे गायब; नाहक मनस्ताप

अन् पोलिसांकडे धाव

  1. हा प्रकार बुधवारी सायंकाळी ४ ते ७.३० या कालावधीत घडला. याप्रकरणी म्हापसा न्यायालयाच्या न्यायाधीश रिना फर्नांडिस यांनी पोलिसांत तक्रार दिली.

  2. प्रलंबित मालमत्ता सुनावणी प्रकरणात संशयितांनी न्यायाधीशांच्या वाहनाचा पाठलाग केला. तसेच न्यायालयातील महिला कर्मचाऱ्यास धमकी दिल्याची तक्रार पर्वरी पोलिसांनी नोंद केली आहे.

  3. म्हापशाहून पर्वरीत पोहचल्यावर न्यायाधीशांनी घाबरून आपले वाहन पर्वरी पोलिस स्थानकाच्या दिशेने वळवले. त्यानंतर मात्र दोघे संशयित तेथून पसार झाले.

  4. त्यानंतर न्यायाधीशांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वाहनाच्या तपशिलानुसार काही तासांतच संशयितांच्या मुसक्या आवळल्या.

Mapusa Court
केदारनाथचे दर्शन घेऊन परतणाऱ्या गोव्यातील भाविकांच्या वाहनाला आग

म्हणे, ‘तुला काय ते दाखवतो’

बुधवारी सायंकाळी सुनावणीनंतर संशयितांनी न्यायालयातील सीमा नामक कनिष्ठ महिला कारकुनाला ‘तुला काय ते दाखवतो’ अशी धमकी दिली.

त्यानंतर न्यायालयातून घरी जाण्यासाठी बाहेर पडलेल्या न्यायाधीश रिना फर्नांडिस यांच्या कारचा संशयितांनी म्हापसा ते पर्वरीपर्यंत कारने पाठलाग केला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रणिता मांद्रेकर या करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com