CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: जुन्‍या अकादमीच्‍या जागीच तीन वर्षांत कोकणी भवन उभारणार ; मुख्‍यमंत्री

स्थलांतरित वास्तूचे उद्‍घाटन : मावजोंच्या कानपिचक्या

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant : ‘जुन्‍या कोकणी अकादमीच्‍या जागीच पुढील तीन वर्षांत सुसज्‍ज कोकणी भवन उभारण्‍यात येईल’, अशी नि:संदिग्‍ध ग्‍वाही मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली.

गोवा कोकणी अकादमीच्या पाटो-पणजी येथील नव्या स्थलांतरित वास्तूच्या उद्‍घाटनप्रसंगी बोलत होते.

व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, लेखक महाबळेश्‍वर सैल, राजभाषा संचालक राजू गावस, अकादमीचे अध्यक्ष प्रा. अरुण साखरदांडे, सचिव मेघना शेटगावकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

‘कोकणी भाषा साहित्य आणि संस्कृतीच्या विकासासाठी कोकणी अकादमीची स्थापना करण्यात आली होती. परंतु गेली कित्येक वर्षे अकादमीचे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतर होत आहे. आत्ताचे हे पाचवे स्थलांतर असून गेली ३० वर्षे सरकार जागाच शोधत आहे.

बिऱ्हाड आणि घर यात फरक असतो, त्यामुळे कोकणी अकादमीला बिऱ्हाडाऐवजी अद्ययावत वास्तूची गरज आहे’, असे मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमादरम्यान मनोहरराय सरदेसाई यांच्यावरील आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले. तसेच दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कोकणी भवन उभारणार

‘कोकणी भवन उभारण्याचा सरकारचा मानस असून, कोकणी भवनासाठी भिवपाची गरज ना’. इंक्विजिशनवर साहित्यिकांनी बोलणे तसेच लिखाण करणे आवश्‍यक आहे.

साहित्य चळवळीत युवकांचा सहभाग महत्त्वाचा असून युवकांनी साहित्य निर्मिती करणे गरजेचे आहे’, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

बोलींचा अभ्यास आवश्‍यक

कोकणी भाषेच्या अस्मितेबाबत अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. कोकणीच्या विविध बोलींचा अभ्यास होणे गरजेचे असून युवा पिढीने कार्य करणे गरजेचे आहे.

विविध प्रदेशातील प्रांत कोकणी साहित्यात येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक महाबळेश्‍वर सैल यांनी केले.

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले...

  • कोकणी अकादमी चांगल्या वास्तूत स्थलांतरित.

  • कोकणी भवन बांधण्याचे उद्दिष्‍ट्य.

  • मागील ४ वर्षे अर्थसंकल्प कोकणीतून सादर.

  • विश्‍व कोकणी संमेलन आयोजनासाठी अर्थसंकल्पात तरतूद.

  • केंद्रातील विविध परीक्षा कोकणीत व्हाव्यात, यासाठी प्रयत्न.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT