Mahanand Naik Goa: 14 वर्षानंतर बाहेर आलेला 'दुपट्टा किलर' महानंद नाईक आता कसा दिसतो? पाहा फोटो

21 दिवसांच्या कालावधीत महानंद दररोज ओल्ड गोवा येथे हजेरी देण्यासाठी उपस्थित राहावे लागते.
Mahanand Naik Goa
Mahanand Naik GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Mahanand Naik Goa: गोव्यातील दुपट्टा किलर महानंद नाईक सध्या 21 दिवासांच्या फर्लो रजेवर कारागृहातून बाहेर आला आहे. तब्बल 14 वर्षे सजा भोगल्यानंतर बाहेर आलेला महानंद कसा दिसतो याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. 21 दिवसांच्या कालावधीत महानंद दररोज ओल्ड गोवा येथे हजेरी देण्यासाठी उपस्थित राहावे लागते. दरम्यान, आज तो हजेरी देण्यासाठी आला असता त्याचा सध्याचा फोटो समोर आला आहे.

Mahanand Naik Goa
Mahanand Naik GoaDainik Gomantak

सोळा महिलांची हत्या करणारा दुपट्टा किलर महानंद नाईक दररोज ओल्ड गोवा पोलिस स्टेशन येथे हजेरी देण्यासाठी जातो. त्यावेळी त्याचा फोटो समोर आला आहे. निळा शर्ट आणि जिन्समध्ये महानंद हजेरीसाठी आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत दोन पोलिस कर्मचारी देखील दिसत आहेत.

महानंद नाईक (Serial Killer Mahanand Naik Goa) याला 14 वर्षानंतर फर्लो मंजूर (Furlough) झाला आहे. गुरूवारी संध्याकाळी (दि.15 जून) महानंद कोलवाळ कारागृहातून बाहेर आला आहे. 21 दिवसानंतर म्हणजेच 05 जुलै रोजी महानंद पुन्हा कारागृहात दाखल होईल.

Mahanand Naik Goa
Mahanand Naik Goa: 16 महिलांची हत्या करणारा ‘दुपट्टा किलर’, गोव्यातला Serial Killer जो एका कॉलमुळे जाळ्यात अडकला

दरम्यान, महानंद बाहेर येताच या प्रकरणातील एका पिडितेने तिला त्याच्यापासून धोका असल्याचे म्हणत संरक्षणाची मागणी केली. महिलेने अर्ज केल्यानंतर तिला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. 

दरम्यान, महानंद नाईक याला फर्लो मंजूर झाल्यानंतर काही सामजिक नेते याला विरोध करीत असून, महानंदचा तुरूंगातून बाहेर पडल्यानंतरचा फोटो सार्वजनिक करण्याची मागणी करत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories


Suhana Naik Arrest news
Mapusa Police Arrest Murder Suspects
Subhash Naik Death Case
Drowning Death
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com