CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: 'गोव्यात अद्ययावत सुविधा मिळणार'; कृषी महाविद्यालय भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Agriculture College Visit by CM: जुने गोवे येथे नवीन गोवा कृषी महाविद्यालयाचे बांधकाम सुरू असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज या बांधकामाची पाहणी केली, तसेच येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रालाही भेट देऊन सुविधांचा आढावा घेतला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa CM Visits Agricultural University Construction Site and Fisheries Center

तिसवाडी: जुने गोवे येथे नवीन गोवा कृषी महाविद्यालयाचे बांधकाम सुरू असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज या बांधकामाची पाहणी केली, तसेच येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रालाही भेट देऊन सुविधांचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत संबंधित अधिकारी तेथे उपस्थित होते.

गोवा कृषी महाविद्यालयाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही पहिलीच भेट आहे. राज्यातील युवकांना उत्तम दर्जाचे कृषी शिक्षण देताना अद्ययावत सुविधांचा लाभ मिळणार यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. हा भव्य असा परिसर असणार असून लवकरच या महाविद्यालयाचे काम पूर्ण होईल याची खात्री असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करणार

गोवा कृषी महाविद्यालयासाठी नवीन प्रशस्त इमारत बांधली जाणार आहे. स्थानिकांना मासेमारीचे अत्याधुनिक पद्धतीने मासेमारी करण्याचे केंद्र सुरू केले जाणार आहे. यानिमित्ताने ही पाहणी करण्यात आली आहे. कृषी महाविद्यालयात येत्या जूनपासून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सरकार सुरू करणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून ही इमारत बांधली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: "आम्हाला एकही उमेदवार नको असेल तर?" बॅलेट पेपरवर 'नोटा'चा पर्याय नाही; सुर्ल साखळीतील मतदारांची नाराजी

Salt Production Goa: गोव्यात एकेकाळी 75 पेक्षा अधिक मिठागरे होती, 130 प्रकारची मिठे होती; गोमंतकीयांची खरी चव नष्ट होत चालली आहे

Goa Crime: 2024 साली संपला व्हिसा, तरी गोव्यात भाड्याच्या खोलीत मुक्काम; 2 परदेशी नागरिकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Goa ZP Election 2025 Live Update:सकाळी 10 पर्यंत पाळीत सर्वाधिक, तर ताळगावमध्ये सर्वात कमी मतदान

Goa Crime: सोन्याचे दागिने हिसकावले, आरोपीला 3 महिन्यांची शिक्षा; चौकशी अधिकाऱ्यालाही काढले वॉरंट

SCROLL FOR NEXT