CM Pramod Sawant Goa Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: राज्‍यात रोजगाराच्‍या अनेक संधी उपलब्ध

Sanquelim News: १५ जुलैनंतर हॉस्पिटॅलिटी अभ्यासक्रम; ‘ताज’मध्‍ये मिळणार काम

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा हे एक जगप्रसिद्ध पर्यटनस्‍थळ असल्याने हॉस्‍पिटॅलिटी (आदरातिथ्य) क्षेत्रात अनेक संधी गोमंतकीयांची वाट पाहत आहेत. त्याचसाठी १५ जुलैनंतर गोव्यात हॉस्‍पिटॅलिटी नावाचा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्‍यात येणार आहे.

राज्‍यातील आयटीआयमध्ये सहा महिन्‍यांचा हा अभ्यासक्रम पूर्ण केल्‍यानंतर गोव्यातील ‘ताज’ हॉटेलमध्‍ये काम मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

साखळीतील सरकारी उच्च माध्यमिक हायस्कूलच्या बारावीत उत्कृष्ट गुण संपादन करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून मुख्‍यमंत्री बोलत होते.

व्यासपीठावर गोवा राज्य पर्यटन विकास महामंडळाचे सरव्यवस्थापक दीपक नार्वेकर, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष अमरनाथ सूर्यवंशी, सचिव दीपा शंखवाळकर, प्राचार्य शीतल कदम, सहप्राचार्य लीना च्यारी, कार्यक्रम समन्वयक समीर प्रभू यांची उपस्थिती होती.

साखळी ही देवदेवतांची भूमी आहे. या भूमीत राज्य व राष्ट्रीय पातळीवर नाव गाजविणारी व्यक्तिमत्त्वं तयार झाली. अशा या साखळीत शिक्षणाच्‍याही अनेक सोयीसुविधा उपलब्‍ध आहेत. चांगल्या शिक्षणाची परंपरा राखून ठेवण्याचे आव्‍हान आजच्या विद्यार्थ्यांसमोर आहे.

म्‍हणूनच आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते साध्य करण्यासाठी पावले उचला, असे आवाहन दीपक नार्वेकर यांनी केले. दरम्‍यान, यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

‘पंचकर्म’ अभ्यासक्रमातूनही भविष्य घडवा

बारावीत कला शाखा स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांसाठी गोव्यात पंचकर्म अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमातून विद्यार्थी धारगळ येथील आयुष इस्पितळात थेट कामावर रुजू होऊन महिना २५ हजार रुपये कमावू शकतो. आज आपण स्वीकारत असलेल्या अभ्यासक्रमांतून आपणास कुठे नोकरी मिळणार का, हा प्रश्‍‍न जुना झालेला आहे. आज प्रत्येक क्षेत्रात रोजगार उपलब्ध आहेत, केवळ आपली शिकण्याची तयारी असायला हवी, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

हॉस्‍पिटॅलिटी अभ्‍यासक्रम पूर्ण केलेल्‍या विद्यार्थ्यांना सुरूवातीला ‘ताज’ हॉटेल महिना पाच हजार रुपये विद्यावेतन देण्‍यात येईल. तेथे एक वर्ष झाल्यानंतर त्यांना सुमारे २० ते २५ हजार पगार दिला जाईल. गोव्यातील प्रत्येक युवक-युवतीला रोजगार मिळावा व त्यांचे भवितव्‍य सुरक्षित व्हावे अशीच आपली इच्‍छा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT