Sanquelim News: वर्ष वाया जाऊ नये म्हणून दहावी अनुत्तीर्णांनाही समान स्तरावर शिक्षण; मुख्यमंत्री

CM Pramod Sawant: कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून वेगळा विचार
CM Pramod Sawant: कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून वेगळा विचार
Sanquelim CM Sawant Dainik Gomantak

दहावी अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी आज काय करत आहेत, याचा अहवाल आपण प्रत्येक हायस्कूलकडे मागितला आहे. त्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया न जाता त्यांना समान पातळीवर आयटीआय किंवा इतर कोणतेही शिक्षण देऊन प्रमाणपत्र मिळावे व त्यांना भविष्याची दिशा मिळावी यासाठी आपण प्रयत्न करीत आहे.

आपल्याला त्याही विद्यार्थ्यांची चिंता आहे. राज्यात आज शैक्षणिक स्तरावर उपलब्ध अनेक संधींचा लाभ विद्यार्थ्यांना व्हावा, कुणीही कोणत्याही कारणांनी शिक्षणापासून वंचित राहू नये, किंवा वर्ष वाया जाऊ नये यासाठी आपण प्रयत्नरत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

डॉ. केशव बळीराम हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कारापूर तिस्क साखळी येथील डॉ. के. बी. हेडगेवार विद्यामंदिर या नवीन इमारतीचे उदघाटन मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर डॉ. के. बी. हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कृष्णराज सुकेरकर, ‘आरएसएस’चे नेते अस्नोडा हायस्कूलचे प्रमुख मोहन केळकर, स्थानिक समिती अध्यक्ष मनोज सावईकर, विभाग प्रमुख राजाराम कुंडईकर, रा. स्व. संघाचे गोवा विभागचे व्यवस्थापक सदानंद डिचोलकर, मुख्याध्यापक सदानंद मिशाळ, पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा राधिका कामत सातोसकर आदींची उपस्थिती होती.

CM Pramod Sawant: कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून वेगळा विचार
Assagao Demolition: सरकार तडजोड करणार नाही; CM म्हणाले, 'दोषींवर होणार कडक कारवाई'

कृष्णराज सुकेरकर यांनी स्वागत केले. ते म्हणाले की, भारत देशावर ब्रिटिशांनी राज्य करताना येथील संस्कृती, धर्म व शिक्षण संपविण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यानंतर आलेल्या सरकारनेही भारतीय संस्कृती शिक्षणासाठी काहीच केले नाही. यासाठी या संस्थेद्वारे भारतीय व धर्म संस्कृती यावर आधारित शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे.

मनोज सावईकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रतीक्षा पेडणेकर यांनी केले. मुख्याध्यापक सदानंद मिशाळ यांनी आभार मानले.

CM Pramod Sawant: कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून वेगळा विचार
National Education Policy : राष्ट्रीय शिक्षण धोरण नववीसाठी लागू होणार? लवकरच निर्णय

विद्यार्थ्यांचे भवितव्य शिक्षकांच्याच हाती

राज्यात आजही बरेचसे विद्यार्थी तसेच त्यांचे पालकही दहावी बारावीनंतर कोणत्या क्षेत्रात जावे याबाबत अनभिज्ञ असतात. अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ही शिक्षकांची आहे. या विद्यार्थ्यांना पालक मार्गदर्शन करू शकत नाहीत. हे कार्य प्रत्यक्षात सरकारचे नसून शिक्षकांचे आहे. सरकार शिक्षणासाठी चांगल्या साधनसुविधा, सोयी, संसाधने देऊ शकते. परंतु विद्यार्थ्यांना भविष्याबाबत मार्गदर्शन केवळ शिक्षकच करू शकतात. त्यासाठी शिक्षकांनी वैयक्तीकरित्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com