CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM pramod sawant: 'या' तारखेपर्यंत कला अकादमी गोवेकरांसाठी असेल सज्ज

''जागतिक आयुर्वेद काँग्रेसचे आयोजन कला अकादमीतच''

दैनिक गोमन्तक

गोवा राज्यात कला अकादमीच्या नूतनीकरणावरुन गेले काही दिवस आरोप - प्रत्यारोप सुरु असताना कला अकादमीचे काम नोव्हेंबर अखेर पुर्ण कले जाईल, तसेच हा परिसर 8 डिसेंबरपर्यंत वापरासाठी सज्ज होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आज दिली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी कला अकादमीच्या सुरू कामाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.

(cm Pramod Sawant inform Enter Renovated Kala Academy will be ready for use before Dec 8 )

याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, नूतनीकरण केलेल्या कला अकादमीचा संपूर्ण परिसर 8 डिसेंबरपर्यंत वापरासाठी सज्ज होईल, यातील मुख्य सभागृह वगळता कला अकादमीचा इतर सर्व परिसर 20 नोव्हेंबरपूर्वी वापरासाठी तयार होतील आणि इफ्फीसाठी वापरला जाईल. तसेच मुख्य सभागृह 8 डिसेंबरपूर्वी तयार होईल आणि 8 डिसेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत जागतिक आयुर्वेद काँग्रेस आयोजित करण्यासाठी त्याचा वापर केला जाईल, असेही ते म्हणाले.

8 ते 11 डिसेंबर या कालावधीत आयुर्वेद काँग्रेसचे आयोजन

येत्या डिसेंबरमध्ये गोव्यात नवव्या जागतिक आयुर्वेद काँग्रेसचे आयोजन करण्यात येणार आहे. 8 ते 11 डिसेंबर या कालावधीत ही आयुर्वेद काँग्रेसचे आयोजन करण्यात आले असुन त्यामध्ये देशातील 50 हून अधिक तज्ज्ञ आणि संस्था सहभागी होण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम कला अकादमीत नियोजित केला गेला असल्याने कला अकादमी नुतनीकरणास आता वेग येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT