CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Mhaji Bus: 'म्हजी बसमुळे अपघात - वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल', CM सावंताचे प्रतिपादन; 4 इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण

CM Pramod Sawant: गोवा राज्य कदंबा महामंडळातर्फे साखळी मतदारसंघातील ग्रामीण भागातून पणजीत जाण्यासाठी चार इलेक्ट्रिक कदंबा बसेस सुरू केल्या.

Sameer Panditrao

साखळी: गोवा सरकारने खाजगी बसवाल्यांसाठी राबवलेली ‘माझी बस’ ही योजना बस मालकांसह लोकांसाठीही फायदेशीर आहे. त्याचा योग्य लाभ बसवाल्यांनी उठवल्यास गोव्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात सुधारण्यास मदत होईल.

लोकांसमोर स्वतःची गाडी घेऊन फिरण्याऐवजी बसमधून प्रवास करण्याचा योग्य पर्याय उपलब्ध होईल. त्यामुळे अनेक अपघात व वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. यासाठी सर्व बसमालकांनी सकारात्मक विचार ठेवावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.

गोवा राज्य कदंबा महामंडळातर्फे साखळी मतदारसंघातील ग्रामीण भागातून पणजीत जाण्यासाठी चार इलेक्ट्रिक कदंबा बसेस सुरू केल्या असून त्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार गणेश गावकर, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर, सरव्यवस्थापक पेडणेकर सुंदर जल्मी व इतरांची उपस्थिती होती.

पणजी प्रमाणेच गोव्यातील सर्व ग्रामीण भागांमध्ये ही लोकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुलभ व्हावी यासाठी इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्याचा सरकारचा विचार प्रत्यक्षात उतरविण्याचे काम सुरू असून त्याच अनुषंगाने साखळीच्या ग्रामीण भागांमधून लोकांसाठी चार कदंब बसेसचे लोकार्पण करण्यात येत आहेत. याचा योग्य लाभ लोकांनीही घ्यावा, असे आव्हाने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी केले.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते बसेसचे पूजन करून श्रीफळ वाढवून तसेच फित कापून उदघाटन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Birthday: कधीकाळी क्रिकेट किट घ्यायलाही नव्हते पैसे, मॅगी खाऊन काढले दिवस; आज टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर! हार्दिक पांड्याचा संघर्षमय प्रवास

Nana Patekar Death: नाना पाटेकर यांचा मृत्यू कशामुळे झाला? गोमेकॉच्या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर

Nushrratt Bharuccha Health Update: 'पिक्चर अभी बाकी है…', अपघातानंतर नुसरत भरुचाची पहिली पोस्ट; PHOTO शेअर करत चाहत्यांना दिली हेल्थ अपडेट

Job Scam: 52 लाखांच्या फसवणूक प्रकरणाला नवे वळण! अजित शंखवाळकरचा पोलिस अधीक्षकासोबतचा फोटो चर्चेत

खरी कुजबुज: मुख्यमंत्री देणार 'नवरात्री गिफ्ट'?

SCROLL FOR NEXT