CM Pramod Sawant Gomantak Digital Team
गोवा

CM Pramod Sawant : कौशल्य, तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडविण्यासाठी सरकार वचनबद्ध; पत्रादेवी स्मारकाचे काम वर्षभरात

कोडिंग, रोबोटिक, कौशल्य, स्टार्टअप, नावीन्यता, सौरऊर्जा, डिजिटलायझेशन या क्षेत्रांत क्रांती घडवून गोवा विकसित राज्‍य करण्‍यासाठी सरकार प्रयत्नशील

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Revolution Day : स्‍वातंत्र्यसंग्रामातील पिंटो बंड, कुंकळ्ळी बंड, दीपाजी राणे बंड हे दिवस राज्यस्तरावर साजरे केले जातील. स्वातंत्र्यसैनिकांच्या सर्व स्मारकांचे नूतनीकरण करण्‍यात येणार आहे. पिंटो स्मारकाचे काम पूर्ण झाले असून पत्रादेवी स्मारकाचे काम वर्षभरात मार्गी लावण्‍यात येईल.

तसेच दीपाजी राणे यांच्या स्मारकाच्या कामाला लवकरच सुरूवात केली जाईल. कुंकळ्ळीत 15 जुलैला होणाऱ्या ‘कुंकळ्ळी बंड’ दिवस कार्यक्रमाला यंदा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर उपस्‍थित राहून स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

मडगावच्या डॉ. राम मनोहर लोहिया मैदानावर आयोजित 77 व्या क्रांतिदिन सोहळ्‍यात मुख्‍यमंत्री बोलत होते. यावेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार लुईझिन फालेरो, आमदार दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकर, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्ष दीपाली सावळ व नगरसेवक, जिल्हाधिकारी, सरकारी अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्‍यात कौशल्य, तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडविण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. त्यासाठी सर्व गोमंतकीयांचे सहकार्यही तेवढेच महत्वाचे आहे. कोडिंग, रोबोटिक, कौशल्य, स्टार्टअप, नावीन्यता, सौरऊर्जा, डिजिटलायझेशन या क्षेत्रांत क्रांती घडवून गोवा विकसित राज्‍य करण्‍यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री म्‍हणाले.

डॉ. राम मनोहर लोहिया यांच्‍या कुटुंबीयांसह स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार

लोहिया मैदानावरील क्रांतिदिनाच्या कार्यक्रमाला डॉ. राम मनोहर लोहिया यांचे सुपुत्र रमेश चंद्र लोहिया व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते त्यांचा तसेच गुरुदास कुंदे, रोहिदास देसाई, विष्णू आंगले, वामन प्रभुगावकर या स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला.

मान्यवरांच्‍या हस्ते डॉ. लोहिया यांच्या ‘द स्ट्रगल फॉर सिव्‍हिल लिबरेशन’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. 1946 ते 1961 या कालावधीतील गोवा मुक्तिसंग्रामातील घटनांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रारंभी डॉ. राम मनोहर लोहियांच्या स्मारकाला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. नंतर विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीते सादर केली. सूत्रसंचालन अनिल पै यांनी केले.

मुख्‍यमंत्र्यांच्‍या महत्त्‍वपूर्ण घोषणा

  • सरकारच्या योजना तळागाळातील शेवटच्‍या घटकापर्यंत पोहोचविण्‍यासाठी ‘ग्रामीण मित्र’ योजना सुरू करणार.

  •  दहा हजार विद्यार्थ्यांना दिले जाणार कौशल्य विकास क्षेत्रा प्रशिक्षण.

  • अलीकडेच सुरू झालेली ‘माझी बस’ योजना गावागावांत पोहोचविणार.

  • आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेद्वारे राज्‍याच्‍या क्रीडा क्षेत्राचा विकास साधणार.

  • सौरऊर्जासंदर्भातील अक्षयऊर्जा योजना संमत करुन केंद्र सरकारकडे पाठविली आहे. अशी योजना केंद्र सरकारला पाठविणारे गोवा हे पहिले राज्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गोव्याचे कौतुक केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विमान धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड, प्रवाशांना उतरवून केली पुन्हा तपासणी; 'फ्लाय-91'मध्ये गोवा-पुणे प्रवाशांची गैरसोय

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

Goa Assembly Session:राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या आरोपीला अटक

Bicholim: ..शुभ्र जलधारा कोसळती! डिचोलीतील धबधब्यावर पर्यटकांची गर्दी; आबालवृद्ध लुटताहेत आनंद

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

SCROLL FOR NEXT