Goa Congress : लोकसभा निवडणुकीत जनता भाजपला घरी पाठवणार : अमित पाटकर

गोवा काँग्रेसतर्फे ‘भारत जोडो यात्रे’च्या गोवा आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते.
 'Goa jodo yatra'
'Goa jodo yatra' Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa jodo yatra : धर्म आणि इतर मुद्द्यांवरून लोकांमध्ये फूट पाडण्याचे भाजपचे कृत्य उघड झाल्याने देशातील जनता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत या भ्रष्ट जुमला पक्षाला घरी पाठवणार, असा विश्वास काँग्रेसचे गोवा अध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केला आहे.

गोवा काँग्रेसतर्फे रायबंदर सर्कल ते आझाद मैदान-पणजी येथे ‘भारत जोडो यात्रे’च्या गोवा आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते.

या यात्रेला दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार अॅड. कार्लूस फॅरेरा, आमदार एल्टन डिकोस्ता, अमरनाथ पणजीकर, महिला प्रमुख बीना नाईक रिची भार्गव, जोएल आंद्राद्रे, विवेक डिसिल्वा, केनिशा मिनेझिस, विल्मा फर्नांडिस, अहराज मुल्ला, नितीन पाटकर, रेनाल्डो रुझारियो, महेश नादर, विजय भिके,प्रदिप नाईक, जनार्दन भंडारी, विरेन्द्र शिरोडकर, सावियो डिसील्वा आदी उपस्थित होते.

 'Goa jodo yatra'
Mumbai-Goa Vande Bharat Express: अखेर मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसला ग्रीन सिग्नल; जाणून घ्या, तारीख आणि वेळापत्रक

‘भ्रष्ट जुमला पक्ष, धर्म आणि इतर मुद्द्यावर भाजप देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. हे थांबवून संघटित होण्याची गरज आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या यात्रेदरम्यान हे मुद्दे उपस्थित केले आणि लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला,” असे पाटकर म्हणाले.

गिरीश चोडणकर म्हणाले की, "राहुल गांधींची भारत जोडो यात्रा देशाला एकत्र आणण्याच्या उद्देशाने होती. कारण सत्ताधारी भाजप धर्म आणि जातीवरून लोकांमध्ये फूट पाडत आहे. राज्यात बेरोजगारीचे प्रमाण जास्त असल्याने तरुणांमध्ये निराशा आहे. त्यामुळे अनेकजण आमच्यात सामील झाले आणि मला विश्वास आहे की ही शक्ती भाजपच्या कृत्यांचा पर्दाफाश करेल,” असे ते म्हणाले.

 'Goa jodo yatra'
अस्सल चोरी केले अन् बनावट ठेवले, दागिने घेऊन सेल्समन झाला फरार; मुंबई-गोव्यात मौज करून संपले पैसे म्हणून...

या यात्रेत अनेक तरुण सहभागी झाल्याचे सार्दिन यांनी यावेळी सांगितले. “राहुल गांधींना देशाला एकत्र करायचे आहे कारण सत्ताधारी भाजप लोकांमध्ये फूट पाडत आहे. आम्ही या सरकारचा पर्दाफाश करू इच्छितो आणि लोकांना सांगू इच्छितो की या पक्षाने आमच्या देशाचा कसा नाश केला आहे. इथे बेरोजगारी वाढत असून महागाईवर सुद्धा नियंत्रण नाही. आपण भाजपला घरची वाट दाखवली पाहिजे," असे ते म्हणाले.

गोवा प्रदेश युवक काँग्रेसच्या राज्य प्रभारी रिची भार्गव म्हणाल्या की, आजपासून राज्यातील लोक भाजपने उभारलेल्या द्वेषाच्या बाजारपेठेत प्रेमाची दुकाने उघडत आहेत. लोकांना हे समजले आहे की, त्यांच्या जीवनाशी संबंधित वास्तविक समस्या केवळ एकतेनेच सोडवल्या जातील, द्वेष किंवा विभाजनातून नाही. काँग्रेस 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा जिंकेल आणि प्रत्येक प्रकारातील द्वेष नष्ट करेल."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com