Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak

Goa Crime: इन्स्टाग्रामवर केली मैत्री, नंतर बर्थ डे पार्टीला बोलावले अन्...

म्हापसा येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Published on

Goa Crime म्हापसा येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीशी इन्स्टाग्रामवर मैत्री केल्यानंतर संशयित युवकाने भेटायला बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी 17 वर्षीय संशयितास ताब्यात घेऊन त्याची रवानगी अपनाघरात केली आहे.

Goa Crime
Goa Weather Update: राज्यात मॉन्सून जोर पकडणार, वेधशाळेचा अंदाज

संशयिताने अत्याचार केल्यानंतर पीडितेने ही बाब आपल्या घरी सांगितली. तिच्या घरच्यांनी त्वरित पोलिस स्थानकात संशयिताविरोधात लेखी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन याप्रकरणी भादंसंच्या कलम ३६३, ३७६ (३), गोवा बाल अधिनियम कलम ८ (२) तसेच पॉस्को कायदाच्या कलम ४, ६, ८, १२ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

Goa Crime
Goa Weather Update: राज्यात मॉन्सून जोर पकडणार, वेधशाळेचा अंदाज

बर्थ डे पार्टीला बोलावले अन्...

काही दिवसांपूर्वी युवकाची या मुलीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. कालांतराने हे दोघेही एकमेकांना भेटू लागले. मैत्रीचा गैरफायदा घेत संशयिताने तिला शुक्रवारी वाढदिवसाच्या पार्टीला हॉटेलवर बोलावले आणि तेथील रूममध्ये पीडितेवर अत्याचार केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com