CM Pramod Sawant Dainiak Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: "गोवा परप्रांतीयांची 'दुबई' होऊ देऊ नका!" मुख्यमंत्री सावंतांचे युवकांना आवाहन; राज्य-केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीचा हात

PMEGP Goa workshop: गोव्यात बाहेरील लोकांचे वर्चस्व वाढत चालले आहे. गोवा म्‍हणजे त्‍यांची ‘दुबई’ झाली आहे.पारंपरिक व्यवसाय परप्रांतीयांच्‍या ताब्‍यात गेले आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

साखळी : गोव्यात बाहेरील लोकांचे वर्चस्व वाढत चालले आहे. गोवा म्‍हणजे त्‍यांची ‘दुबई’ झाली आहे.पारंपरिक व्यवसाय परप्रांतीयांच्‍या ताब्‍यात गेले आहेत. मात्र स्थानिक युवकांचा उद्योजकतेकडे अपेक्षित कल दिसत नाही. त्‍यांनी नोकरीच्या मागे धावण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची मानसिकता तयार करावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीत केले.पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उद्योग, व्यापार व वाणिज्य खात्याच्या वतीने आयोजित ‘नवीन संधीचा शोध’ या विशेष कार्यक्रम आणि ‘उद्योग संगम’ कार्यशाळेत मुख्‍यमंत्री बोलत होते.

गोमंतकीय युवकांना उद्योजक बनविण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार विविध योजना व आर्थिक साहाय्याच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करत आहेत. असेही ते म्‍हणाले.या कार्यक्रमाला औद्योगिक, व्यापार व वाणिज्य संचालक आश्विन चंद्रू, गोवा एमएसएमई-डीएफओ उपसंचालक डी. आर. जोहरी, एसबीआय एसएमई विभागाचे साहाय्यक सरव्यवस्थापक डी. प्रसाद, केव्हीआयसी एमएसएमई केंद्रीय मंत्रालयाचे साहाय्यक संचालक प्रमोद आंबटकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात गोव्यातील उदयोन्मुख उद्योजक सुरेश पाटील, शिरीष साळुंखे, रत्नदीप सावंत आणि अंजली बर्वे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कार्यशाळेत विद्यार्थी, नवोदित उद्योजक आणि प्रस्थापित व्यावसायिकांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना, आर्थिक साहाय्य, उत्पादन जाहिरात, विक्री तंत्र आणि उद्योग व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

युवकांसाठी अनेक संधी, पण...

गोव्यात प्लंबिंग, इलेक्ट्रिकल कंत्राटदार तसेच पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. मात्र, या क्षेत्रांत स्थानिक युवक कमी प्रमाणात पुढे येत असल्याची खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

ब्युटी पार्लर, कपडे शिवणे अशा साध्या कामांसाठीही आज आम्‍हांला बाहेरील लोकांवर अवलंबून राहावे लागत आहे. गोव्यातील युवकांमध्ये क्षमता असूनही ते पुढे येत नसल्याने बाहेरील लोकांना संधी मिळते.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT