CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Ganesh Chaturthi: सांस्कृतिक चळवळ पुढे येणे आवश्यक

मुख्यमंत्री : 'गणेश वंदना'तून डिचोलीत लोकनृत्याचा आविष्कार

दैनिक गोमन्तक

डिचोली: गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ पुढे येणे आवश्यक आहे. असे मत राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. डिचोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मंगळवारी (ता.6) आयोजित ''गणेश वंदना'' कार्यक्रमाचे समई प्रज्वलीत करून उद्‍घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते.

(cm Pramod Sawant Expressed that social and cultural movement should come forward through Ganeshotsav)

डिचोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सामाजिक कार्याबरोबरच संस्कृती संवर्धनाचेही उत्कृष्टपणे कार्य करीत असल्याचे गोरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढून मंडळाचे अभिनंदन केले. कला आणि संस्कृती खाते आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने ''गणेश वंदना'' हा लोकनृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, कला आणि संस्कृती खात्याचे उपसंचालक अशोक परब, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दत्तगुरु आमोणकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनीही गणेशोत्सव मंडळाच्या कार्याची स्तुती केली. मंडळातर्फे मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उघाटनसत्रानंतर ‘गणेश वंदना’ कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमातून लोकनृत्यांचा आविष्कार घडला. या कार्यक्रमात गोव्यासह गुजरात, राजस्थान आदी राज्यातील कलाकारांनी लोकनृत्य सादर करून आपापल्या राज्यातील लोककलेचे दर्शन घडविले. सुभाष आमोणकर यांनी सूत्रसंचालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT