Chief Minister Pramod Sawant on Goa Restrictions

 
Dainik Gomantak
गोवा

पर्यटनासाठी गोमंतकीयांच्या आरोग्याशी खेळ

गोव्यात तूर्तास नाईट कर्फ्यू नाही, मुख्यमंत्र्यांकडून तज्ज्ञांची शिफारस धाब्यावर

दैनिक गोमन्तक

पणजी : जगभरात ओमिक्रॉन या कोरोना व्हेरियंटचे थैमान सुरू असताना राज्यातही या व्हेरियंटने शिरकाव केला असून एक रुग्ण सापडला आहे. चिंतेची बाब म्हणजे, संक्रमण दर (पॉझिटिव्हिटी रेट) दररोज वाढत आहे. अशा पार्श्वभूमीवर तज्ज्ञ समितीने दिलेल्या शिफारशी डावलून पर्यटन हंगामाचे निमित्त पुढे करून राज्यात तूर्तास रात्रीची संचारबंदी ( Goa Restrictions) (नाईट कर्फ्यू) लावणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

राज्यातील संक्रमण दर असाच वाढत राहिला तर कृती दलाची सोमवार, 3 जानेवारीला बैठक बोलावली असून या बैठकीमध्ये नाईट कर्फ्यूचा (Night Curfew) पुढील निर्णय घेतला जाणार आहे. तोपर्यंत मोठे कार्यक्रम, लग्न सोहळे, पार्टी टाळावी, वातानुकूलीत सभागृहांऐवजी खुल्या जागेत कार्यक्रम घ्यावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. सध्या राज्यातील 94 टक्के लसीकरण पूर्ण झाले असून उरलेल्या 6 टक्के लोकांनी तातडीने लस घ्यावी, अन्यथा हे लसीकरण सक्तीचे केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

संक्रमण दर जास्त, तरीही प्रशासन ढिम्म

तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार सक्रिय रुग्णांची संख्या हजाराच्या वर गेल्यास आणि संक्रमण दर 3.5 झाल्यास निर्बंधांची (Restriction) आवश्यकता असून सरकारने टप्प्या-टप्प्याने निर्बंध लादणे गरजेचे आहे. सोमवारी हा दर 3.6 तर मंगळवारी 4.6 संक्रमण दर होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये संक्रमण दर जास्तच आहे. हा संक्रमण दर या आठवडाभरात असाच राहिला किंवा जास्त झाल्यास कडक निर्बंध लावण्याशिवाय सरकारपुढे पर्याय राहणार नाही.

एकही रुग्ण इस्पितळात दाखल नाही

आतापर्यंत 1 लाख 80 हजार 229 लोकांना कोरोनाची (Corona) बाधा झाली असून यापैकी 1 लाख 76 हजार 174 रुग्ण बरे झाले आहेत. हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.75 टक्के इतके आहे. जगभर ओमिक्रॉनने (Omicron) थैमान घातलेले असताना राज्यात बाधित आणि सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होते आहे की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. सध्या राज्यात 535 रुग्ण सक्रिय असून गेल्या 24 तासांत कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने बळींचा आकडा 3,520 झाला आहे. मात्र, गेल्या 24 तासांत कोणालाही उपचारासाठी रुग्णालयात भरती केलेले नाही. मंगळवारी दिवसभरात 2,776 संशयित रुग्णांच्या चाचण्या केल्या. त्यापैकी 112 जणांना कोरोनाची लागण झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: 'चोकर्स'चा शिक्का पुसण्याची संधी? "यंदा हिशोब चुकता होणार!", माजी कर्णधाराने दिले भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हायव्होल्टेज फायनलचे संकेत

Viral Video: डिलिव्हरीच्या घाईत मृत्यूला दिली हुलकावणी! स्विगी बॉयचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; माणुसकी विसरल्याच्या चर्चेनं सोशल मीडिया तापलं

'बर्च बाय रोमियो लेन'चा मॅनेजर झारखंडमधून अटकेत; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

पर्वरी – चोडणला जोडणाऱ्या पुलासाठी 275 कोटींची निविदा; काम वेळेत पूर्ण न झाल्यास दिवसाला 13.74 लाख द्यावी लागणार नुकसान भरपाई

"इतिहासाचा बदला घ्यावाच लागेल...!"; अजित डोवाल यांनी शत्रूंना सुनावले खडे बोल; भारतीय तरुणांना दिला धगधगत्या क्रांतीचा मंत्र VIDEO

SCROLL FOR NEXT