बाबू आजगावकर हे कुठल्याही 'पक्षात' जाऊदेत आम्ही त्यांच्या सोबतच!

दाडाचीवाडी धारगळ येथील आजगावाकर समर्थकांचा निर्धार..
Deputy Chief Minister of Goa: Babu Ajgaonkar

Deputy Chief Minister of Goa: Babu Ajgaonkar

Dainik Gomantak

मोरजी: बाबूने आजगावकर (Babu Ajgaonkar) यांनी पेडणे मतदारसंघाचा विकास केला.यासाठी बाबूला पक्षाने जर उमेदवारी दिली नाही तरीसुध्दा बाबू आजगावकर कुठल्याही पक्षात गेले आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहिले तरी आम्ही त्यांच्या सोबत राहणार असल्याचा निर्धार दाडाचीवाडी येथे बाबू समर्थक यांनी पञकार परिषदेत निर्धार केला.

<div class="paragraphs"><p>Deputy Chief Minister of Goa: Babu Ajgaonkar </p></div>
Goa Election: 'नकारात्मक शक्तींनी देशाचा पाया कमकुवत केला'

Goa Election: 'नकारात्मक शक्तींनी देशाचा पाया कमकुवत केला'

दाडाचीवाडी येथे दाडेश्वर सभागृहात घेण्यात आलेल्या या पञकार परिषदेला रुपेश हरमलकर , रामदासा हरमलकर, शांताराम राऊळ , उदय पाडलोस्कर , नामदेव कानोळकर, केशव ठाकूर , दशरथ बागकर, रोहन हरमलकर, दिगंबर कानोळकर व रत्नाकांत सावंत उपस्थित होते.

बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar) हे कुठल्याही पक्षात गेले तरी आम्ही त्यांच्या सोबतः रुपेश हरमलकर

यावेळी बोलाताना रुपेश हरमलकर म्हणाले, विधानसभा निवडणूकीचे (Goa Assembly Election) सध्या वातावरण असून उमेदवारीवरून आता बातम्या येत आहेत.अफवा पसरविल्या जातात .जर बाबू आजगावकर याँना उमेदवारी दिली नाही तेरी सुद्धा बाबू अजगावकर हे कुठल्याही पक्षात गेले चारी आम्ही त्यांच्या सोबत राहणार असून आम्ही बाबूचा विकास पहतो.त्यांच्याकडे काम करण्याची धडाडी आहे आम्ही बाबू आजगावकर यांची साथ सोडणार नाही असे रुपेश हरमलकर म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Deputy Chief Minister of Goa: Babu Ajgaonkar </p></div>
Goa Elections: काँग्रेस पक्ष मजबुतीने भाजपचा पराभव करण्यासाठी सज्ज: नंदादीप राऊत

बाबूने पेडणे (Pernem) मतदारसंघाचा विकास केलाः शांताराम राऊळ

यावेळी बोलताना शांताराम राऊळ म्हणाले पेडणे मतदारसंघाचा विकास हा बाबू आजगावकर यांनीच केला. आम्हाला पक्ष लागत नाही.जिथे बाबू आजगावकर जातील तिथे आम्ही असणार आहे.जरी बाबू आजगावकर अपक्ष उमेदवार म्हणून राहिले तरी आम्ही त्यांच्या सोबत राहून त्यांना विजयी करणार असे शांताराम राऊळ म्हणाले.

बाबू आजगावकर यांनी अनेकांना नोकऱ्या दिल्या: उदय पाडलोस्कर

यावेळी उदय पाडलोस्कर हे अपंग निवृत्त सरकारी कर्मचारी म्हणाले , की बाबू आजगावकर यांनी अनेकांना नोकऱ्या दिल्या. अनेकविकासकामे बाबू आजगावकर यांनी केली.आम्ही शंभू भाऊ बांदेकर , देवू मांद्रेकर यांनाही आमदार म्हणून पाहिले माञ बाबू आजगावकर हे गेली वीस वर्षे या भागाचे प्रतिनिधित्व करत असून त्यांच्याकडे काम करण्याची धडाडी आहे.मी अपंग इसम असताना मला त्यांच्यामुळे नोकरी मिळली अशा व्यक्तीच्या मागे आम्ही राहणार असून तेच विधानसभा निवडणुकीत विजयी होणार असल्याचे उदय पाडलोस्कर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com