CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : चालू आर्थिक वर्षात 4,303 रुपयांचा जीएसटी महसूल

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं कृष्णा साळकर यांच्या सूचनेला उत्तर

दैनिक गोमन्तक

पणजी, ता. २१ (प्रतिनिधी) ः २०२१-२२ या आर्थिक वर्षात राज्याला ४,३०३ कोटी रुपये जीएसटी महसूल केंद्राकडून मिळाला आहे. तर याच आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या दरम्यान १,३८९ कोटी निधी मिळाला असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

वास्कोचे आमदार कृष्णा ऊर्फ दाजी साळकर यांनी मांडलेल्या लक्ष्यवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. साळकर यांनी जीएसटी महसूल गळतीसंदर्भात चिंता व्यक्त केली. थोडीशीही महसूल गळती झाल्यास गोव्याला त्याचा फटका बसणार आहे. कारण गोवा हे लहान राज्‍य आहे, असे साळकर म्हणाले.

एसजीएसटी, आयजीएसटी आणि व्हॅट यांना एकत्रित करून महसूल गोवा राज्याला मिळतो. सध्या नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असून, अजून नऊ महिने शिल्लक आहेत. 2020 मध्ये कोरोनाचे संकट सुरु झाल्यानंतर थोडा फरक पडला होता, असेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT