Goa security coordination meeting Dainik Gomantak
गोवा

India Pakistan War: गोव्यात ड्रोन उडवण्यास बंदी, मच्छिमारांवरती निर्बंध! भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्‍यमंत्र्यांकडून सज्‍जतेचा आढावा

Pramod Sawant security meeting: या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीत कार्यक्षमतेत वाढ व आपत्कालीन प्रतिसादाची तयारी यासंबंधी व्यवस्थात्मक पुनरवलोकनही करण्यात आले.

Sameer Panditrao

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील सर्व सुरक्षा यंत्रणांची उच्चस्तरीय बैठक आपल्या निवासस्थानी आज घेतली. उद्भवणाऱ्या नव्या सुरक्षाविषयक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आंतरयंत्रणांमध्ये समन्वय वाढविण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीत कार्यक्षमतेत वाढ व आपत्कालीन प्रतिसादाची तयारी यासंबंधी व्यवस्थात्मक पुनरवलोकनही करण्यात आले. जेटी परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने अधिकाऱ्यांना कळविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सुरक्षा व नियंत्रणासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही सूचनेत नमूद आहे.

गोव्यातील मच्छीमारांना फक्त राज्याच्या सागरी हद्दीतील १२ सागरी मैलांपर्यंतच मासेमारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ट्रॉलर मालकांना त्यांच्या कामगारांचे तपशील स्थानिक मत्स्य विभाग अधिकाऱ्यांकडे सादर करावे लागणार आहेत.

सरकारने नागरी संरक्षण कायद्यांतर्गत उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांची नागरी संरक्षण नियंत्रक म्हणून नियुक्ती केली आहे. ते त्यांच्या संबंधित जिल्ह्यांमधील नागरी संरक्षण दलांचे निरीक्षण करतील आणि निर्वासन, ब्लॅकआउट अंमलबजावणी, नागरी संरक्षण प्रशिक्षण आणि पोलिस व आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी समन्वय यासारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी करतील. हा आदेश तात्काळ लागू झाला आहे.

झालेले काही बदल

दोन्‍ही जिल्‍ह्‍यांमध्‍ये ड्रोन उडविण्‍यास बंदी

नागरी सुरक्षेची जबाबदारी जिल्‍हाधिकाऱ्यांवर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

Goa: सभागृहावर पडले झाड, 2 वाहनांचे नुकसान; पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड

Ganesh Chitrashala: 80 वर्षे जुनी चित्रशाळा, आजही करते गणरायाची सेवा; नातू-पणतूनी ठेवली परंपरा सुरु

Goa Live News: गजपती राजू यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

Goa Film Festival: गोवा चित्रपट महोत्सव कोणासाठी? की फक्त औपचारिक सोहळ्यांचे आयोजन..

SCROLL FOR NEXT