Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: पहलगाम हल्ल्यामुळे वाढदिवस साजरा न करण्‍याचा CM सावंतांचा निर्णय, सर्व कार्यक्रमह रद्द

Pahalgam Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. ते कुठेही शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपलब्ध नसतील.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. ते कुठेही शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपलब्ध नसतील, असे त्यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मडगाव, पणजी, म्हापसा येथील भाजप कार्यालयात शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उद्या दिवसभर ते उपलब्ध असणार होते. सायंकाळी साखळी येथील रवींद्र भवनात जनतेच्या शुभेच्छा स्वीकारणार होते. मात्र आता हे सगळे कार्यक्रम रद्द करण्‍यात आले आहेत. सामाजिक कार्यक्रम होतील. त्‍यात साखळी येथील आरोग्य शिबिराचाही समावेश आहे.

काजू महोत्सव पुढे ढकलला

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पूर्वनियोजित २५ ते २७ एप्रिल यादरम्यान होणारा ‘गोवा काजू महोत्सव’ पुढे ढकलण्‍यात आला आहे. तसेच या हल्‍ल्यात मरण पावलेल्या नागरिकांना आम्ही श्रद्धांजली वाहत असून त्‍यांच्‍या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे गोवा वनविकास महामंडळाच्या अध्यक्षा आमदार डॉ. दिव्‍या राणे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्‍हटले आहे.

काजू महोत्‍सवाच्‍या तारखा मागाहून जाहीर करण्यात येतील. देशात दुःखाचे वातावरण असताना महोत्सव साजरा करणे उचित ठरणार नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्‍याचे कळविण्यात आले आहे.

दरम्यान, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या वतीने उद्या पंचायतराजदिन कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित ‘ग्रामोत्सव’ कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला असल्‍याचे कळविण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT