Goa News: मकाझन येथील तलावात आढळला अज्ञाताचा मृतदेह; वाचा गोव्यातील दिवसभरातील घडामोडी

Goa News: जाणून घ्या गोव्यातील ठळक घडामोडी.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: मकाझन येथील तलावात आढळला अज्ञाताचा मृतदेह

मकाझन येथील तलावात एका अज्ञात पुरूषाचा मृतदेह तरंगताना आढळला. मृतदेह अर्धवट कुजलेला होता आणि मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. तपास सुरू

Goa Crime News: 70किलो गोमांस प्रकरणात अख्तरला 5 दिवसांची पोलिस कोठडी


मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानकावर मंगळवारी ७० किलो गोमांस जप्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अख्तर सैफान बेपारीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Pramod Sawant: कोकण रेल्वेचे पीआय सुनील गुडलर निलंबित

लाचखोरी प्रकरणात अटक केलेले कोकण रेल्वेचे पीआय सुनील गुडलर याला निलंबित करण्यात आले आहे: मुख्यमंत्री सावंत

Cashew Fest Goa: पेहलगाम आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काजू महोत्सव पुढे ढकलण्यात आला

पेहलगाम आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर २५ ते २७ एप्रिल असे तीन दिवस आयोजीत केलेला काजू महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. नव्या तारखा लवकरच कळविण्यात येतील.निवेदन जारी.

Pramod Sawant: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द केले, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उद्या त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. ते यानिमित्त कोणत्याही शुभेच्छा किंवा शुभेच्छा स्वीकारणार नाहीत.

Goa News: अखिल भारतीय अधिवक्ता परिषद गोवा प्रांततर्फे पेहलगाम हल्ल्याचा निषेध

अखिल भारतीय अधिवक्ता परिषद गोवा प्रांततर्फे पेहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना ज्येष्ठ वकील व परिषदचे अध्यक्ष संतोष रिवणकर व इतर पदाधिकारी.

Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे लष्कराने केले दोन दहशतवाद्यांना ठार

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावण्यात आला आणि बुधवारी भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना ठार केले.

Pehelgam Attack News: लग्नाच्या अवघ्या 8 दिवसांनी पहलगाम हल्ल्यात 26 वर्षीय नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ वर्षीय नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांचा दुर्दैवी मृत्यू. लग्नाच्या अवघ्या आठ दिवसांनी ते त्यांच्या पत्नीसह काश्मीरमध्ये होते.

Goa Accident: मोले राष्ट्रीय महामार्गवरील दुधसागर देवस्थान ठिकाणी असलेल्या वळणावर ट्र्क व वॅगनर यांच्यात अपघात

मोले राष्ट्रीय महामार्गवरील दुधसागर देवस्थान ठिकाणी असलेल्या वळणावर ट्र्क व वॅगनर यांच्यात अपघात. चौघे जखमी.पिळये हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी पोलिस जीपमधुन पाठवण्यात आले.

Pehelgam Attack: जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर असलेले ५० हून अधिक गोवेकर श्रीनगरमध्ये अडकले, सर्वजण सुरक्षित

पेहलगाम हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर असलेले ५० हून अधिक गोवेकर श्रीनगरमध्ये अडकले आहेत. दहशतवादी हल्ला झाला तेव्हा गोव्यातील दोन गट पेहलगाममध्ये होते, सर्वजण सुरक्षित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com