CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

दिमाखात होणार St. Francis Xavier Exposition, येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत कामे लागणार मार्गी; मुख्यमंत्र्यांची माहिती

CM Pramod Sawant: येत्या 15 नोव्हेंबर पर्यंत सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या सोहळ्यासंबंधी कामे पूर्ण होतील असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

Manish Jadhav

राज्यात सध्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शव प्रदर्शन सोहळ्याची लगबग सुरु आहे. शव प्रदर्शन सोहळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज (3 नोव्हेंबर) आयोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी या बैठकीसाठी राज्याचे पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा देखील उपस्थित होते. येत्या 15 नोव्हेंबर पर्यंत सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या सोहळ्यासंबंधी कामे पूर्ण होतील, असे मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी सांगितले.

90 टक्के कामे पूर्ण

मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, 'सोहळ्यासंबंधी आतापर्यंत 90 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. मोठ्या दिमाखात यंदाचा सोहळा साजरा केला जाईल. सोहळ्यासाठी हजेरी लावणाऱ्या भाविकांसाठी कदंब गाड्यांची व्यवस्था करण्यात येईल. तसेच, रस्त्याची अर्धवट राहिलेली काम देखील लवकरात-लवकर पूर्ण होतील. यावेळी 200 जणांना व्हीआयपी पास देण्यात येतील.'

कधी होतोय सोहळा?

गोव्यात या वर्षी 21 नोव्हेंबर 2024 ते 4 जानेवारी 2025 या कालावधीत सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा अवशेष दर्शन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देश विदेशातील पर्यटक भेट देतील. सरकार या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करत असून, यासाठी 400 कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. सोहळ्यासाठी पोपना देखील निमंत्रण देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

भाविकांसाठी नोंदणी

राज्य सरकार सेंट फ्रान्सिस झेवियर अवशेष दर्शन सोहळ्यासाठी संकेतस्थळाची निर्मिती करणार असून, भाविकांना यावर नोंदणी करता येईल. या सोहळ्यासाठी भाजप सरकार आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रामुख्याने विचार करत असल्याचे सांवत यांनी यावेळी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT