Yuri Alemao At Goa Asembly Dainik Gomantak
गोवा

Goa Opinion Poll Day: 'अस्मिताय दिन' शासकीय स्तरावर साजरा होणार मुख्यमंत्री सावंतांचे आश्‍वासन; युरींचा ठराव मागे

Goa Assembly Monsoon Session 2024 : सरकारने हा कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे असल्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, गोव्याची वेगळी ओळख अबाधित ठेवण्यासाठी १६ जानेवारी १९६७ साली झालेला ‘जनमत कौल दिवस’ हा ‘अस्मिताय दिवस’ म्हणून शासकीय स्तरावर साजरा करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत दिले. यामुळे यासंबंधीचा खासगी ठराव विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मागे घेतला.

यावेळी आलेमाव यांनी जनमत कौल जिंकल्यामुळे आमचे स्वतंत्र राज्य झाले. गोवा महाराष्ट्रात विलीन होऊ नये यासाठी डॉ. जॅक सिक्वेरा, पुरुषोत्तम काकोडकर, चंद्रकांत देसाई, शाबु देसाई, शंकर भंडारी, ॲड. उदय भेंब्रे, रवी नाईक आदी अनेक ज्ञात-अज्ञात नेत्यांनी योगदान दिले आहे.

त्यांनी गोव्याच्या अस्तित्वासाठी घेतलेले कष्ट पुढील पिढीला कळणे गरजेचे असल्याने राज्य कार्यक्रम म्हणून अस्मिताय दिन आयोजित करणे गरजेचे असल्याचे युरी आलेमाव यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन करावे

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी २०१८ साली राजभाषा संचालनालयाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघात अस्मिताय दिवस साजरा केला होता; परंतु त्यांनंतर तो साजराच केला गेला नाही. सरकारने हा कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे असल्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.

पर्रीकरांचा वारसा चालविणार

आमचे सरकार हे संवेदनशील सरकार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १४ वर्षांनी गोव्याला मुक्ती मिळाली. या सरकारने गोव्याच्या मुक्तीलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार केला. माझ्या कार्यकाळातच घटक राज्य दिन साजरा करण्यास सुरवात झाली.

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकरांनी सुरू केलेला ‘अस्मिताय दिन’ कार्यक्रम भविष्यातही साजरा करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT