CM Pramod Sawant X
गोवा

Sada Vasco: मुख्यमंत्र्यांचे ख्रिसमस गिफ्ट! सडा-वास्कोतील पुनर्वसन झालेल्यांना घरांची मालकी

Rehabilitation Of Houses In Sada Vasco: सडा-वास्को येथे पुनर्वसित घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना त्या घरांची मालकी देण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयासह मागणी केलेल्या ८५ कोटींच्या वाढीव अनुदानाची मागणीही मंजूर झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa government approves additional grant for housing rehabilitation in Sada Vasco

पणजी: गोवा पुनर्वसन मंडळाच्या सर्व मागण्यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मंजुरी दिली. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी बैठक पार पडली. त्यात महत्त्वाचे म्हणजे सडा-वास्को येथे पुनर्वसित घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना त्या घरांची मालकी देण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयासह मागणी केलेल्या ८५ कोटींच्या वाढीव अनुदानाची मागणीही मंजूर झाली आहे.

गोवा पुनर्वसन मंडळाचे अध्यक्ष राजेश फळदेसाई, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, राज्याचे वित्त सचिव, पुनर्वसन मंडळाचे सचिव, उत्तर गोवा व दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आणि मंडळाचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

या बैठकीविषयी माहिती देताना फळदेसाई यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज जी बैठक झाली ती अत्यंत फायदेशीर ठरली. मंडळाच्या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मान्य केल्या. मंडळाने २०२५-२६ या वर्षासाठी ८५ कोटींचे जे अनुदान मागितले होते, त्यास तत्काळ मंजुरी दिली. त्याशिवाय इतर मागण्याही करण्यात आल्या. तत्पूर्वी मंडळाने पुनर्वसन केलेल्यांना त्यांच्या राहात असलेल्या घरांची मालकी हक्क देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सडा-वास्को येथील पुनर्वसन झालेल्या लोकांची अनेक वर्षांपूर्वीची मागणी मान्य झाली आहे.

मंजुरी मिळालेल्या मागण्या अशा :

पुनर्वसन मंडळाच्या कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत देण्यात येणारे वेतन एकाच तारखेला देण्याचे निश्चित केले आहे.

रिक्त असणारी किमान ६० ते ६५ पदे कायमस्वरूपी भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंडळाच्या विविध ठिकाणच्या जमिनीवर पीपीपी तत्त्वावर राबविला जाणार पुनर्वसन प्रकल्प.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: पालेकरांचा ‘आघाडी’ला हात की खोडा?

Attack on Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करावर दोन ठिकाणी हल्ले; 25 जवान ठार, 3 वाहने उद्ध्वस्त; BLAनं VIDEO केला शेअर

Mhadei Water Dispute: 'म्‍हादई' नदीची ताबडतोब पाहणी करा, सरकारची 'म्‍हादई प्रवाह'कडे मागणी; 'इंटरलोक्युटरी' अर्ज सादर करणार

Dasun Shanaka Century: 12 उत्तुंग षटकार, 4 खणखणीत चौकार... दासुन शनाकाचा 'रुद्र अवतार'! 39 चेंडूत ठोकलं शतक VIDEO

Mormugao Port: मुरगाव बंदरातील कंटेनर वाहतूक ठप्प; नियमित फीडर सेवा बंद पडल्याने उद्योगांना फटका

SCROLL FOR NEXT