CM Pramod Sawant in Goa Assembly Session 2023 twitter
गोवा

CM Pramod Sawant: आकर्षक पोर्ट टर्मिनल इमारत तसेच कोकणी भाषा भवन बांधणार; मुख्यमंत्री सावंत यांची घोषणा

विधानसभेत दिली माहिती; रात्री सव्वा दहापर्यंत चालले कामकाज

Akshay Nirmale

CM Pramod Sawant in Goa Assembly Session 2023: राज्यात देखणी पोर्ट टर्मिनल इमारत बांधणार आहे. तसेच कोकणी भाषेसाठी भाषा भवन बांधणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभा अधिवेशनात सोमवारी दिली.

सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता विधानसभेच्या कामकाजास सुरवात झाली होती. रात्री दहा वाजून वीस मिनिटांपर्यंत सभागृहाचे कामकाज सुरू राहिले.

मुख्यमंत्री म्हणाले, सरकारने चार ठिकाणी फ्लोटिंग जेटीची सुरवात केली आहे. आम्ही टर्मिनल इमारत बांधायला सुरवात केली आहे. भविष्यात ती एक उत्तम इमारत ठरेल. राज्यात कार्गो आणि फिशिंग व्हेसेल्सची संख्या 2537 इतकी नोंद आहे.

पॅसेंजर व्हेईकल्स 662 आहेत, वॉटर स्पोर्ट्स व्हेईकल 2940 आहेत, असे सर्व मिळून 6139 व्हेसल्स आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले, कोकणी भाषेच्या संवर्धनासाठी भाषा भवन बांधणार आहे. त्यासाठी अद्याप जागा निश्चित्त केलेली नाही. याशिवाय कोकणीत ट्विट करायला सुरवात केली आहे. प्रसिद्धी खात्यातर्फे कोकणी भाषेत ट्विट केले जात आहे.

सर्व सरकारी विभागांच्या वेबसाईट कोकणी भाषेत आणण्यास सुरवात करणार आहे. सर्व वेबसाईट त्यादृष्टीने कोकणीत अद्ययावत करणार आहे. तथापि, या कामासाठी कोकणी ट्रान्सलेटर कमी मिळत आहेत.

लोकसभेतही ट्रान्सलेटर मिळालेला नाही. कोकणी भाषेतील ट्रान्सलेटरसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले की, वर्क कल्चरसाठी अॅप्रेंटिसशिप योजना आणली. पदवीनंतर अनेक जण शिक्षण सोडतात. अशा योजनांमुळे युवकांना कामाची सवय राहू शकते. माईंडसेट बदलला पाहिजे. तो बदलला तर गोव्यात कुणीही बेरोजगार राहणार नाही, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'बर्च' दुर्घटना, पाचही संशयित 14 दिवस न्यायालयीन कोठडीत!

IND VS SA: धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द, चाहत्याचं भंगलं स्वप्न; BCCIवर संताप

Hitler DNA Analysis: गंभीर लैंगिक आणि मानसिक आजाराचा सामना करत होता 'हिटलर'; DNA चाचणीतून झाला खळबळजनक खुलासा

चित्रपट हिट, रेहमानचा डान्स सुपरहिट, पण अक्षय खन्ना म्हणतो 'फरक पडत नाही'; धुरंधरच्या यशावर दिलं 3 शब्दांत उत्तर!

IND vs SA 5th T20: मालिकेचा फैसला अहमदाबादमध्ये! पाचव्या टी-20 सामन्यावर हवामानाचं सावट की पावसाची खेळी? जाणून घ्या खेळपट्टी आणि वेदर रिपोर्ट

SCROLL FOR NEXT