GFA Grants Direct Entry To 3 Team In Goa Pro League:
GFA Grants Direct Entry To 3 Team In Goa Pro League:Dainik Gomantak

Goa Pro League: पॅक्स ऑफ नागोवा, जीनो, ‘दत्तराज साळगावकर’ संघाला थेट प्रवेश

गोव्यातील फुटबॉलला ‘कॉर्पोरेट’ बळ
Published on

GFA Grants Direct Entry To 3 Team In Goa Pro League: गोव्यातील फुटबॉलला बळ देण्यासाठी राज्यातील ‘कॉर्पोरेट’ पुढे येत आहेत ही आश्वासक बाब असल्याचे मत गोवा फुटबॉल असोसिएशनचे (जीएफए) अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी सोमवारी व्यक्त केले. गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत तीन नव्या संघांना थेट प्रवेशाची माहिती देणाऱ्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत 2023-24 मोसमापासून पॅक्स ऑफ नागोवा व जीनो स्पोर्टस क्लब हे दोन नवे थेट प्रवेश मिळालेले संघ असतील, तर 2024-25 मोसमापासून ‘दत्तराज साळगावकर’ टीम स्पर्धेत भाग घेईल आणि त्या मोसमापासून स्पर्धा एकूण 14 संघांत खेळली जाईल, असे कायतान यांनी नमूद केले.

GFA Grants Direct Entry To 3 Team In Goa Pro League:
Goa Assembly Monsoon Session 2023 Day 5 : अवैध कॅसिनो बंद करणार; 130 होमगार्डना पोलिस म्हणून नियुक्ती - मुख्यमंत्री

‘‘राज्यातील ‘कॉर्पोरेट’ गोमंतकीय फुटबॉलमध्ये गुंतवणूक करण्यास पुढे येत आहेत, हे सुचिन्ह आहे. हे नवे संघ स्थानिक गुणवत्तेचा पुरस्कार करणार असून येथील फुटबॉलमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करतील. येथील फुटबॉलला व्यापक संधी आणि व्यासपीठ मिळावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

गतवर्षी उशिरा मोसम सुरू होऊनही आम्ही 826 सामने खेळविले. यावर्षी 2200 सामने नियोजित आहेत,’’ असे कायतान म्हणाले.

जीनो, साळगावकर यांची 50 लाखांची बोली

गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेसाठी जीनो फार्मास्युटिकल्सचे दिलीप साळगावकर यांची मालकी असलेल्या जीनो स्पोर्टस क्लब आणि उद्योगपती दत्तराज साळगावकर यांची मालकी असलेल्या संघाची ‘कॉर्पोरेट’ गटात प्रत्येकी 50 लाख रुपये बोली होती, तर स्थानिक संघ या नात्याने पॅक्स ऑफ नागोवा संघाला 30 लाख रुपये बोलीद्वारे थेट प्रवेश देण्यात आला, असे जीएफए उपाध्यक्ष जोनाथन डिसोझा यांनी सांगितले.

GFA Grants Direct Entry To 3 Team In Goa Pro League:
Rishabh Pant: पुढच्या वर्षीही ऋषभ पंत आयपीएल खेळणार नाही? 'या' दिग्गज वेगवान गोलंदाजाचे मोठे वक्तव्य

दृष्टिक्षेपात गोवा प्रो-लीग स्पर्धा

  • 2022-23 पर्यंत स्पर्धेत 11 संघ

  • पॅक्स ऑफ नागोवा व जीनो स्पोर्टस क्लबच्या थेट प्रवेशामुळे 2023-24 पासून 13 संघ

  • ‘दत्तराज साळगावकर’ संघाच्या समावेशाने 2024-25 पासून 14 संघांची स्पर्धा

  • प्रो-लीग विजेत्या संघाला एआयएफएफ तृतीय विभागीय स्पर्धेत प्रवेश, तेथून आय-लीगकडे वाटचाल

  • यंदाच्या स्पर्धेसाठी यंग बॉईज ऑफ टोंक (वायबीटी) संघ प्रथम विभागातून पात्र

  • साळगावकर एफसीने स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर त्यांच्याजागी कुठ्ठाळी व्हिलेजर्स संघाचा समावेश

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com