Political Leaders Visit At Babu Kavlekar Residence On Ganesh Chaturthi: विधानसभा निवडणुकीत यश मिळाले नसले तरी माजी उपमुख्यमंत्री व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाबू कवळेकर यांचा राजकीय व सामाजिक 'रूतबा' कायम आहे.
चतुर्थीला त्यांच्या बेतुल येथील निवासस्थानी झालेल्या वार्षिक श्री सत्यनारायण पूजेला मुख्यमंत्र्यांसह बडे राजकीय नेते, राज्यभरातील स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने लावलेल्या उपस्थितीतून हे सिद्ध झाले आहे.
कवळेकर यांच्या बेतुल येथील निवासस्थानी मंगळवारी झालेल्या सत्यनारायण पूजेला व विविध स्पर्धांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सभापती रमेश तवडकर, सविता तवडकर, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, मडगावचे आमदार दिगंबर कामत, आशा कामत यांनी उपस्थिती लावली.
तसेच राज्यसभेचे माजी खासदार विनय तेंडूलकर, कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स, वास्कोचे आमदार दाजी साळकर, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, माजी मंत्री डॉमनिक फर्नांडिस, माजी मंत्री फ्रान्सिस सिल्वेरा, माजी मंत्री आवेर्तान फुर्तादो, माजी मंत्री जयेश साळगावकर, माजी आमदार क्लाफास डायस, माजी आमदार मोहन आमशेकर, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक उपस्थिती लावली.
दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर, उपाध्यक्ष खुशाली वेळीप, जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप, सिद्धार्थ गावस देसाई, संजना वेळीप, धाकू मडकईकर, गिरीश उसकईकर, गोपाळ सुर्लकर, केप्याच्या नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, भाजपचे नेते गोविंद पर्वतकर, भाजपचे राज्य सचिव व दक्षिण गोवा सहप्रभारी सर्वानंद भगत, दक्षिण गोव्यातील सरपंच, पंच, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी कवळेकर यांच्या निवासस्थानी उपस्थिती लावली.
कवळेकर आमदार ?
बाबू कवळेकर यांना विधानसभा निवडणुकीत यश मिळाले नसले तरी त्याच्या निवासस्थानी नेते, कार्यकर्ते व नागरिकांची झालेली गर्दी व त्यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता कवळेकर हे आमदार आहेत, असेच भासत असल्याचे उद्गार तानावडे यांच्यासह बहुतेक राजकीय नेत्यांनी यावेळी काढले.
अन् उमेदवारीवर चर्चेला उधाण
चतुर्थीनिमित्त कवळेकर यांच्या घरी जणू राजकीय नेत्यांचा मेळाच भरला होता. विशेष म्हणजे भाजपसह इतर पक्षांतील नेते तसेच समाजाच्या सर्व थरातील लोकांची उपस्थिती लक्षणीय होती. या घटनेमुळे कवळेकर यांच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीच्या चर्चेलाही उधाण आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.