Goa Monsoon
Goa MonsoonSandip Desai

Goa Monsoon 2023: पावसाचा जोरदार तडाखा; काणकोणात एकूण पाऊस 129 इंच

नदी-नाले तुडुंब
Published on

Goa Monsoon 2023: परतीच्या पावसाचा जोर वाढल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. काणकोणात शुक्रवारी २.२१ इंच पावसाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत १२९ इंच पाऊस झाला आहे. चापोली धरणाच्या जलाशयात ३८.८० मीटर म्हणजे ११२८.२१ हेक्टोमीटर पाणी साठा झाला आहे.

दरम्यान, पावसाचा जोर वाढत असल्याने नागरिकांमध्ये साल २००९ ची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. काणकोणात २ ऑक्टोबर २००९ मध्ये मुसळधार पाऊस होऊन पूर आला होता. या पुरात सुमारे शंभर घरे जमीनदोस्त झाली.

उभी पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. तसेच पैंगीण येथील संदीप पैंगीणकर व बाबुली महाले हे दोन नागरिक पुराच्या पाण्यात वाहत गेल्याने मृत्यूमुखी पावले होते.

यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने भरड व अन्य शेतीची लागवड ऑगस्ट महिन्यापर्यंत लांबली होती. त्यामुळे भात शेती व कुमेरी मिरचीसाठी हा पाऊस फायदेशीर ठरेल, असे विभागीय सहाय्यक कृषी अधिकारी सर्वानंद सर्वणकर यांनी सांगितले.

Goa Monsoon
CCP Meeting: मडकईकर-फुर्तादो आक्रमक; ‘स्मार्ट सिटी’वरून महापालिका सभेत गोंधळ

डिचोली तालुक्यात पडझड

गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने शुक्रवारी कहर केला. सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, काही भागात पडझडीच्या घटना घडल्या. जोरदार पावसामुळे नदी नाल्यात पाणी वाढले असून अनेक भागात पाणी तुंबले आहे.

विविध ठिकाणी गटारे तुंबल्याने पाणी रस्त्यांवरून वाहताना दिसत आहे. डिचोलीसह वाळवंटी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. मात्र स्थिती नियंत्रणात आहे.

दरम्यान, उसप येथे एक झाड रस्त्यावर पडले. यात विद्यूत वाहिन्यांचे नुकसान झाले. डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी हे झाड हटविले.

मोपा मुख्य रस्त्यावर माड कोसळला

राज्यात शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. दाडेश्वर मंदिर, मोपा येथील मुख्य रस्त्यावर माड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली.

त्यामुळे वाहतूक पोरस्कडे मार्गावर वळविण्यात आली. यावेळी वाहतूक पोलिस निरीक्षक विश्वजित चोडणकर हे अन्य वाहतूक पोलिसांसमवेत वाहतुकीवर नियंत्रण ठेवून होते.

Goa Monsoon
Vedanta: वेदांता गोव्‍यातील खाणी कर्जफेडीसाठी विकणार?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com