Pramod Sawant dainik gomantak
गोवा

Goa Election 2022 : मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची हँट्रीक

मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचा साखळीत हँट्रीक विजय, भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष..!

दैनिक गोमन्तक

साखळी : साखळी मतदारसंघातून अतितटीच्या लढतीत भाजपचे उमेदवार मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी काँग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी यांचा अवघ्या ३८० मतांनी पराभव करुन साखळी मतदार संघातून सलग तीन वेळा निवडून येण्याची हँट्रीक केली. यावेळी साखळीत कार्यकर्त्यांनी एकचा जल्लोष करुन आनंदोत्सव साजरा केला. (Chief Minister Dr. Pramod Sawant's hat trick from the Sakhali Vidhan Sabha Constituency)

या मतदार संघातून सलग तीन वेळा निवडून येऊन विक्रम करणारे डॉ.प्रमोद सावंत हे केवळ दुसरे आमदार ठरले आहेत. यापुर्वी साखळीतून (तत्कालीन पाळी मतदार संघ) पहिले आमदार (MLA) मगोचे अच्युत उसगावकर यांनी सलग तीन वेळा निवडून येण्याचा विक्रम केला होता. पाळीचे नाव साखळी केल्यानंतर कुणालाही सलग तीन वेळा निवडून येता आले नाही. डॉ.प्रमोद सावंत यांना हा विक्रम करता आला आहे.

साखळी बरोबर संपुर्ण गोव्याचे (Goa) लक्ष या साखळी मतदार संघाकडे लागून राहिले होते. या मतदार संघात अतितटीची लढत अपेक्षित केली होती. मतमोजणीच्यावेळी दोघांमध्ये मतांच्या आंतरात चढाओढ दिसून येत होती शेवटी मुख्यमंत्री डॉ.सावंत (Pramod Sawant) यांनी बाजी मारली व निसटत्या मतांच्या फरकाने विजय मिळवला. मुख्यमंत्र्यांचा विजय जाहिर होताच साखळीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष झाला. साखळी येथील भाजप कार्यालय व छत्रपती शिवाजी राजे चौक परिसरात तसेच मुख्यमंत्र्यांच्या हाऊसिंग बोर्ड येथील निवासस्थानी भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी एकत्र जमून फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच ढोल ताशांची भव्य मिरवणूक साखळी मतदार संघातून काढण्यात आली.

विजय अपेक्षित पण मताधिक्य अनपेक्षित..

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) राजकीय घडामोडीसाठी पणजीतच राहिल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांचे वडील माजी जिल्हा पंचायत सदस्य पांडूरंग सावंत यांची भेट घेतली असता, ते म्हाणाले मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचा विजय अपेक्षित होता. पण एवढे नगण्य, अल्प मताधिक्य अपेक्षित नव्हते. मुख्यमंत्र्यांनी साखळी मतदार संघाचा (Sakhali Vidhan Sabha Constituency) विकास करताना चांगल्या संकल्पना राबविल्या. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना (scheme) नागरिकांना मिळवून दिल्या. महिला, युवा, जेष्ठांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले. पण जनतेने अपेक्षित कौल दिला नाही. चांगले काम करुनही जनतेने विरोधात मतदान केले. केवळ देव पाठिशी राहिल्यानेच हा विजय मिळाला. त्यामुळे मतदान केलेल्या मतदारांबरोबर देवालाही कोटी कोटी नमन करतो. शेवटी विजय (Victory) हा विजयच असतो, त्यामुळे हा विजय सर्वांना सुखावून गेला आहे.सर्वांना समाधान मिळाले आहे.

- पांडूरंग सावंत(माजी जि.प.अध्यक्ष)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT